17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeताज्या बातम्यापाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा निषेध; पुण्यात शिवसेनेचे आंदोलन आणि प्रतीकात्मक फाशी

पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा निषेध; पुण्यात शिवसेनेचे आंदोलन आणि प्रतीकात्मक फाशी

पुणे- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्यावतीने आज स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. ‘दहशतवाद असाच संपविला जातो!’ असा ठाम संदेश शिवसेनेच्यावतीने जनतेसमोर मांडण्यात आला.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे, तर भारतीय माणुसकीवर झालेला घात आहे. आम्ही आज शांत बसणार नाही. पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्‍यांना, जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात, त्यांना कडक उत्तर दिलं जाईल. या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल!

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व इतर अंगिकृत संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. स्वारगेट चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी, देशभक्तीपर नारे, आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.

शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की, “या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा, आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी.”

या आंदोलनाच्या निमित्ताने पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्र्याला जोरदार प्रतिसाद दिला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दर्शविली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,पंकज कोद्रे,सुदर्शना त्रिगुणाईत,आनंद गोयल, लक्ष्मण आरडे,सुनील जाधव, सुधीर कुरुमकर,विकी माने,गौरव साईनकर,विकास भांबुरे,दत्ता खवळे,नवनाथ निवंगुणे,अभिजीत बोराटे, गणेश काची,शंकर संगम,संदीप शिंदे,दीपक कुलाळ,आकाश रेणुसे, सुरेखा पाटील,महेंद्र जोशी,निलेश जगताप,तुषार मरळ,अक्षय तारु,उद्धव कांबळे, संदेश पावसकर,गडकरी सर,प्रशांत डाबी,नागेश अडसूळ,अकबर शेख, विशाल सरवदे, प्रणव थोरात, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!