30.4 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeविश्लेषण"मेंढपाळाचा मुलगा ते IPS अधिकारी: बिरदेव ढोणे यांची प्रेरणादायी संघर्षगाथा"

“मेंढपाळाचा मुलगा ते IPS अधिकारी: बिरदेव ढोणे यांची प्रेरणादायी संघर्षगाथा”

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावात जन्मलेला बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना आहे. पारंपरिक मेंढपाळ कुटुंबात वाढलेल्या बिरदेवने आपल्या कठीण परिस्थितीवर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवून आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.



बालपण आणि शिक्षणाची सुरुवात

बिरदेवचे वडील सिध्दाप्पा डोणे हे मेंढपाळ व्यवसाय करत होते. बिरदेवही लहानपणापासून मेंढ्या राखण्याचे काम करत असे. त्याच्या शालेय जीवनातही तो मेंढ्यांसोबत डोंगरदऱ्यांत फिरत असे. शाळेत त्याची प्रगती चांगली असल्याने शिक्षकांनी त्याच्या वडिलांना त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वडिलांनी मेंढपाळ व्यवसाय थांबवून कुटुंबाला गावी आणले.

बिरदेवने यमगेच्या विद्यामंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले. दहावीला ९६% आणि बारावीला ८९% गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात प्रथम आला. गणित विषयात त्याला शंभरपैकी शंभर गुण मिळाले

अभियांत्रिकी आणि UPSCची तयारी

बिरदेवने पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी (COEP) महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना त्याला यूपीएससीची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण मिळाले. २०१७ मध्ये त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. सुरुवातीला दोन वर्षे सेल्फ स्टडी केली आणि २०२१ मध्ये दिल्ली येथे क्लासेस लावले. २०२२ मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले. २०२३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात केवळ तीन गुणांनी मेन्स परीक्षेत अपयश आले. मात्र, त्याने हार न मानता २०२४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

निकालाचा क्षण

२२ एप्रिल २०२५ रोजी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्या दिवशी बिरदेव आपल्या मामांच्या मेंढ्यांसोबत बेळगावजवळील डोंगराळ भागात होता. निकालाची बातमी मिळाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. त्याच्या काकांनी त्याच्या डोक्यावर पिवळा फेटा बांधून आणि कपाळावर भंडारा लावून अभिनंदन केले.


प्रेरणादायी संघर्ष

बिरदेवचा प्रवास हा ग्रामीण भागातील, मर्यादित साधनसंपत्ती असणाऱ्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्याच्या यशामुळे संपूर्ण देशात त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने दाखवून दिले आहे की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही

बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे. त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने दाखवून दिले आहे की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.4 ° C
30.4 °
30.4 °
63 %
5.2kmh
9 %
Sun
33 °
Mon
32 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!