32.4 C
New Delhi
Monday, October 13, 2025
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांचे सर्वांगीण घडवणारा महोत्सव

विद्यार्थ्यांचे सर्वांगीण घडवणारा महोत्सव

पिंपरी चिंचवड महापालिकेचा वार्षिक स्नेह उत्सव गाजला

पिंपरी, – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(Pimpri Chinchwad Municipal Corporation Education Department) शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह उत्सव, गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला आयुक्त शेखर सिंह, (PCMC Annual Gathering 2025)अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

“शिक्षण क्षेत्रात सातत्याने काम केल्यास सर्व समस्यांवर मात करता येईल,” असे त्यांनी नमूद केले.

गेल्या तीन वर्षांत शिक्षण विभागाने उल्लेखनीय बदल साधले असून पुढील पाच वर्षांत शाळांच्या खोल्या, मैदानांसह विविध समस्या सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भोसरी, दापोडी, दिघी भागातील शाळांमध्ये डान्स रूम, कला कक्ष व स्टाफ रूमची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न:
आयुक्तांनी ८वी, ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. “सक्षम” उपक्रम लवकरच आवश्यकतेनुसार समाप्त करून विद्यार्थ्यांसाठी सुसंगत उपाययोजना राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी ६४ शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षक नियुक्त (PCMC School Award Ceremony)केले जाणार आहेत. तसेच सर्व खेळांची सुविधा एकाच छताखाली मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिक्षण व क्रीडा क्षेत्रात नवे बदल:
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी (Student Development Programs PCMC )शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय जाहीर केला. “सारथी पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे शिक्षकांच्या अनेक तक्रारींचे समाधान झाले असून शिक्षणात पारदर्शकता वाढली आहे,” असे ते म्हणाले. क्रीडाप्रबोधिनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक प्रकल्प व नव्या योजना:
कार्यक्रमात ‘सामाजिक, भावनिक, नैतिक विकास आणि जीवन कौशल्य’ (SEE Learning) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी सराव पुस्तिका, शैक्षणिक कॅलेंडर आणि समर किटचे प्रकाशन करण्यात आले.

गुणवत्तेचा आढावा आणि गौरव:
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) अहवालानुसार वाचन, लेखन व गणित विषयात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुरस्कारप्राप्त शाळा:

  • सर्वोत्कृष्ट बालवाडी: स्वामी विवेकानंद विद्यामंदिर काळभोर
  • सर्वोत्कृष्ट इंग्रजी माध्यम शाळा: महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा, दळवीनगर
  • अभ्यासक्रम, अध्यापन व मूल्यांकन विजेती: पीसीएमसी पब्लिक स्कूल, चन्होळी
  • शालेय संस्कृती व व्यवस्थापन विजेती: पीसीएमसी पब्लिक स्कूल, मोशी
  • विद्यार्थी व पालक सहभाग विजेती: पीसीएमसी पब्लिक स्कूल, दिघी कन्या

इतर उत्कृष्ट शाळांमध्ये काळेवाडी, कुदळवाडी, उद्यमनगर व पिंपळे सौदागर येथील शाळांचा समावेश होता. विजेत्या शाळांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.4 ° C
32.4 °
32.4 °
22 %
2.4kmh
0 %
Mon
32 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!