6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालीका ने ११,९६२ ट्रॅक्टर केली विक्री

सोनालीका ने ११,९६२ ट्रॅक्टर केली विक्री

भागधारकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा नीतिमत्तापूर्ण व्यवसाय करतानाच सोनालिका सातत्याने ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे ट्रॅक्टर आणि सेवा पुरवत आहे

पुणे,-: भारताच्या नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने एप्रिल २०२५ मध्ये ११,९६२ ट्रॅक्टर्सची विक्री नोंदवून आर्थिक वर्ष २०२६ ची दमदार सुरूवात केली आहे. शेतकरी प्रथम या आपल्या तत्त्वज्ञानाचा ब्रँडला सातत्याने लाभ मिळत आहे. प्रत्येक प्रदेशानुसारच्या शेतकऱ्यांच्या गरजांना अनुरूप अत्याधुनिक ट्रॅक्टर कस्टमाईज्ड करून देशभरातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि लाभदायक वाढ शक्य करणारे मूल्याधिष्ठित उपाय सादर करण्यात सोनालिका सातत्याने अग्रेसर राहिली आहे. सोनालिका ट्रॅक्टर्सने आपली बहुप्रतीक्षित ‘सोनालिका तूफानी धमाका’ अगोदरच सादर केली आहे. त्यातून अविश्वसनीय किंमतीत सोनालिका हेवी ड्युटी ट्रॅक्टर घरी आणण्याची उत्साहवर्धक संधी देशभरातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.

खरीप पिकांच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत वाढ आणि रब्बी पेरणीचा बळकट अंदाज, त्याच प्रमाणे मान्सूनचा चांगला अंदाज यामुळे भारतातील शेतकरी समुदायात आशेचे वातावरण आहे. शेतीच्या समृद्धीला चालना देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने सोनालिकाचे हेवी ड्युटी ट्रॅक्टर जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. कंपनीला जगातील नंबर १ इंटिग्रेटेड ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी असलेल्या तिच्या कारखान्याच्या सामर्थ्याचा लाभ होतो. तेथून दर २ मिनिटांनी एक उच्च-गुणवत्तेचा ट्रॅक्टर बाहेर पडतो आणि भारतीय शेतकऱ्यांना कामगिरीवर आधारित उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतात.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, आमचे हेवी ड्यूटी ट्रॅक्टर धोरणात्मकदृष्ट्या विकसित केले गेले असून किमान खर्चात शेतकऱ्यांची कामगिरी उंचावण्यासाठी ते सज्ज आहेत. प्रत्येक शेतात समृद्धी आणण्यासाठी शेतकरी-प्रथम या विचारसरणीने त्यांना मार्गदर्शन होते. सोनालिका ट्रॅक्टर्सने त्या-त्या वर्गातील सर्वोत्तम ट्रॅक्टर पुरविताना नेहमीच ‘नो कॉम्प्रोमाइज’ धोरणाचे अनुसरण केले असून ते भागधारकांचे हित जास्तीत जास्त वाढवितात. तसेच पुढील वर्षभरात नवीन उपक्रमांद्वारे आमच्या ग्राहकांना शाश्वत आनंद सुनिश्चित करतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
100 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!