25 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeमनोरंजननृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; पाच भाषणांमध्ये होणार प्रदर्शित

नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; पाच भाषणांमध्ये होणार प्रदर्शित

२५ जुलैला येणार चित्रपटगृहात भेटीला

हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक महाकाव्यात्मक पौराणिक कहाणीचे उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले.

अश्विन कुमार यांचा आगामी चित्रपट ‘महावतार नरसिंह’ सध्या आपल्या जबरदस्त पोस्टर्समुळे खूप चर्चेत असून हा चित्रपट हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रोडक्शन्सने संयुक्तपणे निर्मित केला आहे. ‘महावतार’ ही एक सिरीज आहे आणि ही त्यातील पहिली कडी आहे. भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या कथा यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. महावतार नरसिंह हा हॉम्बले फिल्म्सचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या बॅनरने याआधी KGF Chapter 1 & 2, सालार: पार्ट 1 – सीजफायर, आणि कांतारा सारखे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

नृसिंह जयंतीच्या दिवशी, ‘महावतार नरसिंह’च्या निर्मात्यांनी २५ जुलै २०२५ ही प्रदर्शन तारीख निश्चित केली आहे. या विशेष घोषणेसाठी एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये महावतार नरसिंहाचा रौद्र रूप आणि त्याची दिव्य गर्जना दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओमधून एक संदेश दिला आहे.

महावतार नरसिंह’चे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई आहेत . कलीम प्रोडक्शन्सच्या अंतर्गत त्यांनी हॉम्बले फिल्म्ससोबत मिळून हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट 3D फॉरमॅटमध्ये आणि पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
25 ° C
25 °
25 °
90 %
3.7kmh
33 %
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
31 °
Sat
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!