मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल आज, १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला असून यंदाही कोकण विभागाने ९९.८२% टक्केवारीसह अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याचा एकूण निकाल ९५.७२% इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण पुन्हा ‘नंबर वन’ आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
आज मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. या वर्षीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे.
राज्यातील इतर विभागांपैकी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोल्हापूर विभागांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे.
या वर्षी दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागाने ९६.५४%, तर मुंबई विभागाने ९३.७८% इतकी टक्केवारी नोंदवली आहे.
यंदा राज्यभरातून सुमारे १५.७ लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.
मुलींची यशाची टक्केवारी यंदाही मुलांपेक्षा अधिक असून, मुलींची निकालाची टक्केवारी ९७.३४%, तर मुलांची ९४.१२% इतकी आहे.
✅ राज्यात विभागनिहाय निकालाचा आढावा:
विभाग | टक्केवारी |
---|---|
कोकण | ९९.८२% |
पुणे | ९६.५४% |
कोल्हापूर | ९६.३२% |
अमरावती | ९५.९१% |
नागपूर | ९५.०७% |
औरंगाबाद | ९४.८५% |
नाशिक | ९४.२९% |
लातूर | ९३.९८% |
मुंबई | ९३.७८% |
कोकण विभागाचे उत्तुंग यश हे विद्यार्थ्यांची मेहनत, पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शालेय व्यवस्थापनाच्या समन्वयाचे प्रतिक मानले जात आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!