२००७ मध्ये आलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या ‘तारे जमीन पर’चा स्पिरिच्युअल सिक्वेल असलेला ‘सितारे जमीन पर’ या वर्षी सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक ठरतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. कारण ही एक अशी कथा आहे जी प्रेम, हसू आणि आनंदाने भरलेली एक सुंदर प्रवास सादर करते.
या खास प्रवासात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात १० नवोदित कलाकार पदार्पण करत आहेत, जे आपल्या सादरीकरणाने आधीच प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.
‘सितारे जमीन पर’ चे नवे तारे कोण?
हो, आता वेळ आली आहे या नव्या झळकणाऱ्या ‘सितार्यां’शी भेटण्याची – गुड्डू, सुनील, शर्माजी, करीम, लोटस, बंटू, सतबीर, राजू, गोलू आणि हरगोविंद हे आहेत चित्रपटातील लहान तारे, जे आपल्या प्रशिक्षक गुलशन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेक्षकांना हसवतील, रडवतील आणि भावूक करतील.
सोशल मीडियावर या नव्या कलाकारांची ओळख करून देताना, निर्मात्यांनी लिहिले आहे , ” भेटा या चमकणाऱ्या ताऱ्यांशी, जे गुलशनच्या 👃 मध्ये आणतील दम! 🌟
#SitaareZameenPar चा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटगृहात 20 जूनला भेटूया!”**
[इंस्टाग्राम लिंक: https://www.instagram.com/p/DJs3pRPzyk6/?img_index=9\&igsh=N3FuaTJ2azZ3eTN5]
१० राइजिंग स्टार्स – एक अभिमानास्पद लॉन्च
आमिर खान प्रोडक्शन्स अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांना मोठ्या पडद्यावर सादर करत आहे – आणि या कलाकारांना ‘सितारे जमीन पर’ मधून भारतीय सिनेसृष्टीत नवे स्थान मिळणार आहे.
ताकदीच्या टीमकडून दर्जेदार सादरीकरण
‘शुभ मंगल सावधान’सारखी टॅबू तोडणारी ब्लॉकबस्टर देणारे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आता आमिर खान प्रोडक्शन्ससोबत ‘सितारे जमीन पर’मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा कोलॅबोरेशन घेऊन परतत आहेत.
आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट अमिताभ भट्टाचार्य यांचे गीत, आणि शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत घेऊन सजला आहे. दिव्य निधी शर्मा यांनी या चित्रपटाचे पटकथा लेखन केले असून आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.