“दायित्व, सेवा, समन्वय आणि हक्क
या चार आधारांवर उभा समाजाचा कळस!”
संघटन बांधणीच्या प्रक्रियेत एक नवा अध्याय लिहिला गेला,
जिथे जुनी मुळे खोलवर रुजली आणि नव्या पालवांची दिशा ठरली…
पुणे जिल्ह्याच्या ब्राह्मण पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा,
केवळ बैठक नव्हे, तर समाजासाठी एक दृढ संकल्प होता!

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी कार्यशाळा व मेळावा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला पुणे जिल्ह्यातील सर्व २१ शाखा व २२ आघाड्यांतील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्राह्मण समाजाच्या संघटन बळकटी, युवा-स्त्री सक्षमीकरण आणि पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
कार्यशाळेच्या प्रारंभी मंत्रोच्चारांनी वातावरण भक्तिभावपूर्ण झाले. या वेळी ८६ नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रोजेक्टरद्वारे महासंघाची कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, आणि विविध सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी “दायित्व, सेवा, समन्वय आणि हक्क” हे महासंघाचे चार प्रमुख आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, संघटना ही केवळ नावे-गावावर चालत नाही, तर कामगिरी, बांधिलकी आणि दूरदृष्टीवर चालते.
राज्य अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी पुणे जिल्ह्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत मराठवाड्यातील महिलांना देवदर्शन व कार्यशाळा अनुभवासाठी आमंत्रण दिले. पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी भविष्यातील नियोजन मांडताना दोन नवीन आघाड्यांची निर्मिती आणि महासंघासाठी स्वतंत्र भवन उभारणीचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात विविध आघाड्यांचे पदाधिकारी, युवक-युवती आणि महिला प्रतिनिधींनी आपल्या शाखांतील कार्याचा आढावा मांडला. महिला आघाडीच्या केतकी कुलकर्णी, ब्राह्मद्योग आघाडीचे अमोघ पाठक, सभासद नोंदणीचे कमलेश जोशी, नोकरी अभियानासाठी रेश्मा सारंग व रंगोली देशमुख, युवतींच्या कल्याणी खर्डेकर व रेणुका गोखले, तसेच साहित्य आघाडीच्या वंदना धर्माधिकारी यांचे मोलाचे विचार मांडले गेले.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणांमध्ये चित्रपट नाट्य आघाडीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, साहित्यिक प्रदीप रत्नपारखे, राजू बावडेकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यासोबतच विलास कौसडीकर, प्रवीण कुलकर्णी, दिलीप सातभाई, वृषाली शेकदार आदी मान्यवर केंद्र व प्रदेश समितीकडून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधव तिळगूळकर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी ऋचा पाठक, विकास अभ्यंकर, राहुल जोशी, राजेश सहस्त्रबुद्धे यांचे विशेष योगदान लाभले.
एकूणच, ही कार्यशाळा केवळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपुरती मर्यादित न राहता, ब्राह्मण समाज संघटनेच्या पुढील वाटचालीस दिशा देणारी आणि संघटनात्मक बळकटीचा विश्वास निर्माण करणारी ठरली.