28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमनोरंजन‘द ट्रेटर्स’चा टीझर केला प्रदर्शित!

‘द ट्रेटर्स’चा टीझर केला प्रदर्शित!

१२ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार शो

प्राइम व्हिडिओ इंडिया प्रस्तुत करतो “द ट्रेटर्स” – ग्लोबल हिट रिअॅलिटी शोचा भारतीय अवतार, करण जोहरच्या शानदार होस्टिंगसह १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर प्रीमियर

भारतातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे आवडते व्यासपीठ असलेल्या प्राइम व्हिडिओने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो द ट्रेटर्सच्या प्रीमियरची घोषणा केली. हा शो १२ जून २०२५ पासून केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता (IST) नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

IDTV च्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेत्या जागतिक फॉरमॅटवर आधारित असलेला हा शो भारतात All3Media International च्या सहकार्याने आणि BBC Studios India Productions च्या निर्मितीत सादर करण्यात येत आहे. हा जगभरातील सर्वात वेगाने लोकप्रिय होणाऱ्या रिअॅलिटी शो फॉरमॅट्सपैकी एक असून ३० पेक्षा अधिक देशांमध्ये याचे ३५ हून अधिक आवृत्त्या तयार झाल्या आहेत.

भारतीय प्रेक्षकांसाठी या विशेष आवृत्तीत करण जोहर होस्ट म्हणून आपला ग्लॅमर आणि खास शैली घेऊन येणार असून शोमध्ये भारतभरातील विविध क्षेत्रातील २० प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. विश्वास आणि फसवणुकीच्या या अनोख्या खेळात प्रत्येकजण मोठ्या रोख बक्षिसासाठी आणि प्रतिष्ठेच्या ‘अल्टिमेट विनर’च्या किताबासाठी स्पर्धा करणार आहेत.

प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्राइम व्हिडिओने आधी एक आकर्षक आउटडोअर प्रचार मोहिम राबवली आणि त्यानंतर करण जोहरने एक खास व्हिडिओद्वारे केवळ प्रीमियर दिनांकच जाहीर केला नाही, तर शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींबाबत काही संकेत देखील दिले. या व्हिडिओत आगामी ड्रामा, थरार आणि अप्रतिम ट्विस्टची झलकही देण्यात आली.

प्राइम व्हिडिओ इंडिया ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक म्हणाले, “प्राइम व्हिडिओने आजवर देशातील सर्वात मोठ्या स्क्रिप्टेड शोस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. आता आम्ही अनस्क्रिप्टेड कंटेंटच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलत आहोत आणि ‘द ट्रेटर्स’सारखा आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो घेऊन येत आहोत. थरार, रणनीती, सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला हा शो उच्च दर्जाच्या निर्मितीमूल्यांसह सादर केला आहे. करण जोहर सारखा होस्ट असल्यामुळे या खेळात रंगत आणली जाणार यात शंका नाही!”

All3Media इंटरनॅशनलच्या EVP APAC, सबरीना डुगेट म्हणाल्या, “भारत हा एक अत्यंत रोमांचक आणि गतिमान मार्केट आहे जिथे प्रेक्षक रिअॅलिटी कंटेंटला प्रचंड प्रतिसाद देतात. ‘द ट्रेटर्स’चे भारतीय रूप सेलिब्रिटींच्या सहभागाने, थरारक ट्विस्ट्सनी आणि थिंकिंग गेमप्लेमुळे प्रेक्षकांसाठी एक अत्युत्तम अनुभव ठरणार आहे. आम्ही प्राइम व्हिडिओ इंडिया आणि बीबीसी स्टुडिओज इंडिया प्रोडक्शन्ससह ही फ्रँचायझी भारतात सादर करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

BBC Studios India Productionsच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, नेहा खुराना म्हणाल्या, ” ‘द ट्रेटर्स’ने आपल्या बोल्ड, नाट्यमय आणि मानसशास्त्रीय गेमप्लेमुळे जगभरातील विविध भाषा व वयोगटातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्राइम व्हिडिओ आणि All3Media इंटरनॅशनलसारख्या उत्कृष्ट कंटेंट देणाऱ्या भागीदारांसह आम्ही एक भव्य, रंजक आणि ड्राम्याने भरलेला भारतीय अवतार सादर करत आहोत. सेलिब्रिटींचा तगडा सहभाग आणि सतत धक्के देणारे ट्विस्ट हे या शोला एक अविस्मरणीय अनुभव बनवतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!