पुणे, – : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी (एसव्हीयू ), मुंबई ही एक अत्यंत प्रगतीशील आणि बहूविध शिक्षण देणारी खासगी संस्था आहे. या संस्थेतर्फे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अंडरग्रॅज्युट पोग्राम्ससाठी आता प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. विविध क्षेत्रांसाठीच्या आघडीच्या १०० हून अधिक प्रोग्राम्स आणि सहजसोप्या प्रवेशफेऱ्यांसह एसव्हीयू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योगक्षेत्रांशी संबंधित जागतिक अनुभव यासह करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवणारी शैक्षणिक प्रक्रिया देऊ करते. संस्थेतील अर्ली अॅडमिशन अॅप्लिकेशनसाठीची अंतिम तारीख ३१ मे २०२५ आहे
मुंबईसारख्या उत्साही शहरात मोक्याच्या ठिकाणी वसलेले, ८० वर्षांचा शैक्षणिक उत्कृष्टतेचा वारसा सांगणारे एसव्हीयू उच्च शिक्षणातील नाविन्यपूर्णतेसाठी कायमच अग्रणी राहिले आहे. सखोल शिक्षण, उत्कृष्ट सोयीसुविधा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि उत्साही दमदार कॅम्पस जीवन यातून हे विद्यापीठ भविष्यासाठी सज्ज असे ग्रॅज्युएट घडवण्यासाठी ओळखली जाते.
“प्रत्येक विद्यार्थ्याला सखोल विचार करणे, ठळकपणे नाविन्यता मांडणे आणि तत्व जपत नेतृत्व करण्यासाठी शिक्षणाने सज्ज करावे यावर सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीमध्ये आमचा कायमच विश्वास आहे. आमच्या एकात्मिक, समग्र दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच भविष्याला नवा आकार देण्याची दृष्टी आणि कौशल्ये विकसित करता येतील, याची खातरजमा होते. या उत्साही, सर्वसमावेशक आणि जगाशी जोडल्या जाणाऱ्या शैक्षणिक समुदायाचा भाग होण्यासाठी आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करत आहोत,” असे एसव्हीयूचे कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष प्रा. व्ही.एन. राजशेखरन पिल्लई म्हणाले.
प्रत्येकाच्या आवडीनुसार बहूविध शैक्षणिक शाखा विद्यार्थ्यांना अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांमध्ये इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी (बीटेक/ऑनर्स (सर्व स्पेसिलायझेशन मध्ये), ड्युएल डिग्री: बीटेक+ एमएस, मुंबई (३.५ वर्षं) + न्यूयॉर्क, यूएसए (१.५ वर्षं), कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट: (बीबीए, बीबीएम, बीकॉम डेटा अनालिस्ट), ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस: बीए लिबरल आर्ट्स, बीएसस्सी इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, जर्नालिझम,
प्युअर अॅण्ड अप्लाइड सायन्सेस: बीएसस्सी (बीएसस्सी+एमएसस्सी) बीएस-एमएस इंटिग्रेटेड, बीएस्सी डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आयटी आणि क्रिएटिव्ह अॅण्ड प्रोफेशनल स्टडीज: (डिझाइन, म्युझिक, परफॉर्मिंग आर्ट्स, एज्युकेशन आणि इतर बरेच कोर्स चे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.