28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानआदित्‍य बिर्ला ज्‍वेलरी ब्रँड इंद्रिया कडून पुण्‍यामध्‍ये तिसरे स्‍टोअर लाँच

आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरी ब्रँड इंद्रिया कडून पुण्‍यामध्‍ये तिसरे स्‍टोअर लाँच

इंद्रियाचे महाराष्‍ट्रातील सहावे शोरूम आहे

पुणे,- : आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरी ब्रँड इंद्रियाने पुण्‍यातील औंध येथे तिसऱ्या स्‍टोअरच्‍या लाँचसह महाराष्‍ट्रातील आपले विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे. गेल्‍या वर्षी बंड गार्डन आणि पिंपरी येथे यशस्‍वी पदार्पणांनंतर या नवीन उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या स्‍टोअरमधून महाराष्‍ट्रातील सूक्ष्‍मदर्शी व वैविध्‍यपूर्ण ज्‍वेलरी ग्राहकांप्रती ब्रँडची सखोल कटिबद्धता दिसून येते. यासह इंद्रियाचे राज्‍यभरात सहा स्‍टोअर्स कार्यरत आहेत.
उदयास येत असलेले आर्थिक हब आणि संपन्‍न ज्‍वेलरी बाजारपेठ पुणे इंद्रियाला अधिकाधिक ग्राहकांशी संलग्‍न होण्‍याची लक्षवेधक संधी देते. या शहराचा संपन्‍न महाराष्‍ट्रीयन वारसा, तसेच उत्‍साहीपणा, आधुनिकता या शहराला कालातीत कारागिरी व आकर्षक डिझाइन असलेले दागिने दाखवण्‍यासाठी योग्‍य गंतव्‍य बनवते.
आकर्षक सोने, हिरे व पोल्‍की डिझाइन्‍ससह पुण्‍यातील ज्‍वेलरी बाजारपेठेत पारंपारिक आणि समकालीन आकर्षकतेचे सुरेख संयोजन आहे.
पारंपारिक व आधुनिक आकर्षकतेचे कौतुक करण्‍यासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या पुण्‍यातील ज्‍वेलरी बाजारपेठ इंद्रियाच्‍या मुलभूत तत्त्वाशी संलग्‍न आहे. २०,००० हून अधिक दागिन्‍यांचे क्‍यूरेटेड कलेक्‍शन आणि सोने, हिरे व पोल्‍कीमधील ५,००० हून अधिक विशेष डिझाइन्‍ससह इंद्रिया प्रत्‍येक आवड, प्रसंग व स्‍टाइलसाठी आभूषण देते, ज्‍यामुळे प्रत्‍येकासाठी हे योग्‍य गंतव्‍य आहे.
२०२४ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून इंद्रियाने भारतभरात स्थिर प्रगती केली आहे. नवीन लाँचसह इंद्रिया आता देशभरात २४ स्‍टोअर्ससह कार्यरत आहे. यापैकी दिल्‍लीमध्‍ये पाच स्‍टोअर्स, मुंबई, हैदराबाद व पुणे येथे प्रत्‍येकी तीन स्‍टोअर्स, अहमदाबाद, जयूपर व पटणामध्‍ये प्रत्‍येकी दोन स्‍टोअर्स आणि इंदौर, सुरत, आंध्रप्रदेश व उत्तरप्रदेशमध्‍ये प्रत्‍येकी एक स्‍टोअर आहे. यासह ब्रँडची उत्तर, दक्षिण व पश्चिम भारतात प्रबळ उपस्थिती आहे.
इंद्रियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहली म्‍हणाले, ”आज ज्‍वेलरी स्‍वयं-अभिव्‍यक्‍तीचे प्रबळ माध्‍यम आहे, जेथे वारसा व आधुनिक डिझाइनचे संयोजन होते आणि कारागिरीमधून वैयक्तिक गाथा सांगितली जाते. इंद्रियामध्‍ये आम्‍ही नेहमी संस्‍कृतीमध्‍ये रूजलेली आणि सर्जनशीलरित्‍या विशिष्‍ट असलेली ज्‍वेलरी निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो.

संपन्‍न कलात्‍मक वारसा व समकालीन दृष्टिकोन असलेले पुणे शहर आमच्‍या विकास प्रवासाचा महत्त्वपूर्ण भाग राहिले आहे. औंधमध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या तिसऱ्या स्‍टोअरमधून शहरवासीयांचा आमच्‍या दृष्टिकोनाप्रती प्रतिसाद, तसेच या उत्‍साही प्रांतामधील उत्तम दागिन्‍यांच्‍या जाणकारांना सक्षम करण्‍याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. आम्‍ही महाराष्‍ट्रातील आमची उपस्थिती वाढवत असताना अर्थपूर्ण डिझाइन, अपवादात्‍मक दर्जा आणि व्यक्तिमत्त्वाला साजरे करणारा अनुभव देण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
आदित्‍य बिर्ला ग्रुपच्‍या विश्‍वसनीय वारसाचे पाठबळ असण्‍यासह इंद्रिया वारसा, कारागिरी आणि समकालीन डिझाइनला एकत्र करण्‍याच्‍या कटिबद्धतेसह पुण्‍यातील आपली उपस्थिती वाढवत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!