24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रविश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – : माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्राद्वारे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या “विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५” या मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पश्चिम विभाग (सोहम गंभीर)े, मराठवाडा (अथर्व वाघचौरे) आणि विदर्भ (गौरी मुंडोकार) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माईर्स एमआयटी पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकासाची जोड दिली आहे. संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून जगात विश्वशांती व राष्ट्रनिर्मितीचे काम करतील. हा उद्देश्य ठेऊन गेल्या १२ वर्षापासून मूल्याधिष्टित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. २०२५ या वर्षापासून परीक्षेचे रुपांतर शिष्यवृत्ती मध्ये करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी १०वीचा विद्यार्थी बसू शकतो. त्या विद्यार्थ्याला १०वींत ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती त्याला ११वी आणि १२वी या दोन वर्षासाठी दिली जाईल.
विभागात गुणानुक्रमे येणार्‍या विद्यार्थी प्रथम (२५ हजार), द्वितीय (२० हजार), तृतीय (१५ हजार), चतुर्थ (१० हजार) आणि पाचवा (५ हजार) ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या परीक्षेचा निकाल ः पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय,विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे(चतुर्थ, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर )
मराठवाडा विभागः अथर्व अमोल वाघचौरे (प्रथम, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई), वैभवी तातेराव लहाडे (द्वितीय, श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर रूई), आर्या सचिन गडदे (तृतीय, कै. दादाराव कराड विद्यालय,अंबाजोगाई), सुरज विश्वंबर गायकवाड (चतुर्थ, मुकुंदराज विद्यालय, नांदगाव), दिव्या विलास धांडे (पाचवी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव)

विदर्भ विभागः गौरी गोपाळ मुंडोकार(प्रथम, श्री शिवाजी विद्यालय,अकोट), पयोष्णी विजय पार्शिवकर (द्वितीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), सह्याद्री अरविंद कळसकर (तृतीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), स्वराज नितीन बंड (चतुर्थ , जनता विद्यालय,पूर्णानगर), वैभवी नंदकिशोर अकोटकर (पाचवा, श्री शिवाजी विद्यालय, अकोट )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!