17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeक्रीड़ाना.चंद्रकांतदादा पाटील हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते - संदीप खर्डेकर

ना.चंद्रकांतदादा पाटील हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते – संदीप खर्डेकर

"क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सकल हिंदू ग्रुप तर्फे दादांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न".

पुणे- प्रत्येक नेत्याचे एक वैशिष्ट्य असतं पण ना. चंद्रकांतदादा पाटील हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते आहेत आणि ते सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आपलं कार्य पार पाडत असतात असे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांनी केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सकल हिंदू ग्रूप ने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,परशुराम हिंदू सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वजित देशपांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक ) पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद माणकीकर,संयोजक कल्याणी प्रतीक खर्डेकर,सकल हिंदू ग्रूप चे स्वप्नदीप वैद्य, सिद्धार्थ पांडे इ उपस्थित होते. चंद्रकांतदादा यांच्या कडे मदत मागण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती विन्मुख जात नाही, ते आलेल्या प्रत्येकाला गरजेनुसार मदत करत असतात असे संदीप खर्डेकर म्हणाले. तर चंद्रकांतदादा हे कार्यकर्त्याला जपणारे आणि माणुसकी असणारे नेते असल्याचे प्रसन्नदादा जगताप म्हणाले. सकल हिंदू ग्रूप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने तरुणांना क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र केले पण भावी काळात हिंदू तरुणांचे संघटन आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेऊन सकारात्मकतेकडे वळविणे गरजेचे असल्याचे विश्वजित देशपांडे म्हणाले. मंदार रेडे आणि मकरंद माणकीकर यांनी देखील मनोगत व्यक्त करताना दादांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव केला. सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी खेळ भावना जपली पाहिजे असे सांगतानाच कोणीतरी जिंकले म्हणून सगळं संपत नाही तर अधिक जोमाने पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची असते आणि यशाचा मार्ग हा तेथेच सुरु होतो असे सांगितले. स्वप्नदीप वैद्य आणि सिद्धार्थ पांडे यांनी सांगितले की स्पर्धा आयोजित करताना अपेक्षेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला, त्यातून संघ निवड केली व सेवन अ साईड स्पर्धा पार पडल्या.सिद्धार्थ पाटणकर च्या नेतृत्वाखालील पेरिल संघाने विजय मिळविला व चषक पटकावला. सिंहगड रस्त्यावरील आर. एस. स्पोर्ट्स ग्राउंड येथे या स्पर्धा पार पडल्या. पुढील स्पर्धा ह्या अधिक व्यापक स्वरूपात घेऊ असा निर्धार संयोजक प्रतीक खर्डेकर,स्वप्नदीप वैद्य आणि सिद्धार्थ पांडे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!