28.8 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसायकल प्युअर अगरबत्तीकडून पुण्यात नाविन्यपूर्ण सुगंधी धूप सादर

सायकल प्युअर अगरबत्तीकडून पुण्यात नाविन्यपूर्ण सुगंधी धूप सादर

ब्रँडद्वारे सुगंधी अनुभवाची समृद्धी आणि समुदायांना सक्षम करणे कायम राहणार

पुणे, – : सायकल प्युअर अगरबत्ती ही भारतातील आघाडीची उदबत्ती उत्पादक कंपनी म्हणून उभी असून ती ७७ वर्षांचा लक्षणीय प्रवास साजरा करत आहे. एका छोट्या खोलीतून सुरुवात करून या कंपनीने करत ७५ हून अधिक देशांमध्ये आपल्या सुगंधाचा प्रभाव वाढवला आहे, त्यातून तिने जागतिक प्रवासाला सुरुवात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या अगरबत्ती उत्पादकांपैकी एक असलेल्या सायकल प्युअर अगरबत्तीने पुण्याच्या बाजारपेठेत ‘थ्री इन वन वायटी इन्सेन्स स्टिक्स’ आणि ‘प्रेरणा बांबूलेस इन्सेन्स स्टिक्स’ ही दोन नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली आहेत. गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विविधता यांच्या शोधात असलेल्या आधुनिक ग्राहकांचा आध्यात्मिक आणि सुगंधी अनुभव समृद्ध करण्यासाठी ही नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यात आली आहेत.

भक्ती, शुद्धता आणि नाविन्यपूर्णतेचे प्रतीक असलेली ‘प्रेरणा’ ही बांबूविरहित (बांबूलेस) सॉलिड अगरबत्ती आहे. सायकलच्या आयकॉनिक थ्री-इन-वन अगरबत्ती पॅकने ती प्रेरित आहे. आरोग्य, संपत्ती आणि आनंद यासाठीच्या सार्वत्रिक प्रार्थनांना समर्पित असलेल्या तीन दिव्य सुगंधांसहित ‘प्रेरणा’ येत आहे. तिच्या पातळ, अगरबत्तीएवढ्या लांबीच्या ठोस धूप स्वरूपामुळे भावपूर्ण संवेदनशील अनुभव मिळतो. तिची किंमत केवळ १० रुपये असून पर्यावरणपूरक, बांबूविरहित धूप पर्यायांची वाढती मागणी ती पूर्ण करते. त्याच सोबत ती आपली अतुलनीय सुगंध गुणवत्ता टिकवून ठेवते.

‘थ्री-इन-वन वायटी’ अगरबत्ती ही बारीक दळलेल्या, स्थानिक पातळीवर मिळविलेल्या लाकडाच्या भुग्यापासून (पावडर) तयार केली जाते. त्यामुळे सुंगधी दरवळ आणि प्रसार वाढतो. दीर्घकाळ टिकणारा सुगंध आणि उत्तम सुगंध प्रसारण हवे असलेल्यांसाठी हिची रचना करण्यात आली आहे. प्रार्थना विधी आणि दैनंदिन वातावरण निर्मितीसाठी ‘वायटी’ ही आदर्श आहे. सायकलच्या क्लासिक थ्री-इन-वन वारशाने प्रेरित तिच्या मोहक अशा ९ सेमी, उदबत्तीची काठी आणि सुगंध मिश्रणासह, ‘वायटी’मुळे संतुलित, समृद्ध सुगंधी प्रवासाची हमी मिळते. हिची किंमत २५ रुपयांपासून सुरू होते.

सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अर्जुन रंगा म्हणाले, “आमच्या उत्पादनांतून ग्राहकांना एक अनोखा आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकांना त्यांच्या जीवनामध्येही वैविध्य आणि नाविन्य हवे असल्याने, आम्हालाही ते उपलब्ध करून द्यायलाच हवे.“

या संवादात त्यांनी सायकल प्युअर अगरबत्तीचा उल्लेखनीय प्रवास, पुण्याच्या बाजारपेठेतील त्याचे महत्त्व, महिला सक्षमीकरणासाठी तिची कटिबद्धता आणि तिच्या धर्मादाय उपक्रमांचा खोलवरचा प्रभाव याबद्दल मौल्यवान माहिती दिली.

सायकल प्युअर अगरबत्तीने समाजात योगदान देण्यासाठीची कटिबद्धता कायमच जपली आहे. गेल्या ७७ वर्षांत, हा ब्रँड ६ अब्ज प्रार्थनांना अभिव्यक्ती मिळवून देणारे माध्यम ठरले आहे. आशा, विश्वास आणि प्रार्थनेच्या शक्तीचे ते प्रतीक ठरले आहे. कल्याण तसेच भाविकांमध्ये आणि ईश्वरामध्ये संपर्क निर्माण करण्याची भावना निर्माण करून तिने जीवन उजळविण्याचे कार्य चालू ठेवले आहे.

सायकल प्युअर अगरबत्ती २०१४ मध्ये सुरू झालेल्या ग्रामीण उपजीविकेच्या परिवर्तनकारी अशा गडचिरोली अगरबत्ती प्रकल्प (GAP) या उपक्रमालाही आधार देते. या प्रकल्पाने १,२०० हून अधिक आदिवासी महिलांना सक्षम बनविले असून त्यांच्या घरगुती उत्पन्नात सरासरी तिप्पट वाढ झाली आहे. सायकल प्युअर अगरबत्तीने आपल्या स्थापनेपासून ५,५०० टनांहून अधिक कच्च्या अगरबत्ती आणि ८ लाख डझन कापसाच्या वाती खरेदी केल्या आहेत. हा उपक्रम आर्थिक मध्यस्थीकडून एका समर्थ सामाजिक चळवळीपर्यंत विकसित झाला आहे. त्यामुळे पूर्वी दुर्लक्षित असलेल्या प्रदेशाला प्रतिष्ठा आणि शांती लाभली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.8 ° C
28.8 °
28.8 °
35 %
4.4kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!