सोलापूर- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपलया पाठपुराव्याने मे महिन्यात 13 जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ अर्थसाहाय्य मिळवून दिले आहे. 12 लाख 85 हजारांची मदत देऊन या 13 कुटुंबाच्या चेहर्यावर समाधानाचे हसू आणण्याचे मोलाचे सामाजिक काम आ. देशमुख यांनी केले आहे.
आ. सुभाष देशमुख यांनी अनेकांना अडचणीतून सोडवण्याचे समाजिक काम केले आहे. अडचण घेऊन आलेला प्रत्येकजण समाधानी कसा होऊन जाईल यासाठी आ. देशमुख यांची धडपड असते. गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत व्हावी, त्यांना मोठ्या अडचणीतून सोडवता यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेकांची कामे केली. मे महिन्यात आ. देशमुख यांनी 13 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ अर्थसाहाय्य मिळवून दिले आहे. गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवासुविधा मिळाव्यात यासाठी आ. देशमुख यांनी आपली विशेष यंत्रणा उभारली आहे.रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो. आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा ते काम योग्य पद्धतीने पार पाडत आहे. मे महिन्यात आमदार देशमुख यांच्या प्रयत्नांमधून राजेंद्र गंगाधर तारापुरकर, गजानन मारुती कुंभार, वत्सलाबाई पुंडलिक मोरे, राजश्री दत्तात्रय झिंबल, कमलाबाई शाम नरोटे, बालाजी सिद्राम यलगुंडे, अफरोज जाकीर मुल्ला, चैत्राली अमर कानडे, शिवन्या प्रदीप गायकवाड, दत्तात्रय भगवान जाधव, शिवाजी नागप्पा तुरबे, तानाजी लोहार, स्वाती लगदिवे त्या रुग्णांना 50 हजार पासून ते 2 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. या सर्व रुग्णांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले आहेत.
आ. सुभाष देशमुखांच्या पाठपुराव्याने 13 रुग्णांना बहुमोल मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वतंत्र यंत्रणा; 12 लाख 85 हजार दिले मिळवून
New Delhi
overcast clouds
32.8
°
C
32.8
°
32.8
°
58 %
3.3kmh
100 %
Mon
33
°
Tue
29
°
Wed
34
°
Thu
33
°
Fri
34
°