26.3 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रआजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य ; आ.अमित गोरखे

आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य ; आ.अमित गोरखे

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक, भावनिक विकासावर भर दिला जाणार – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ; स्थानिक लोकप्रतिनिधी व महापलिका अधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद…. आजच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आमदार उमा खापरे यांची थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या प्राथमिक शाळा येथे, आमदार अमित गोरखे यांची पी.सी.एम.सी.पब्लिक स्कूल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर काळभोरनगर येथे तर आमदार शंकर जगताप यांची पिंपळे गुरव येथील पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल येथे विशेष उपस्थिती….

पिंपरी, : आपल्या महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे. त्या क्षमतांना योग्य दिशा देणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मूल्ये आणि मार्गदर्शन मिळाले पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे, आणि वेळोवेळी त्यांनी ती सिद्ध देखील केली आहे.” काळभोर नगर येथील महापालिकेचा माजी विद्यार्थी म्हणून आज याच शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी केले.

थेरगाव येथील शाळेतील कार्यक्रमात बोलताना विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी शिक्षक वर्ग हे मातीच्या गोळ्याला आकार देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थी घडतात. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वागतपर नाही तर नव्या शैक्षणिक वर्षात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असाच आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे या शाळेला भेट देता आली, ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे,असे प्रतिपादन केले.

 विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या अभ्यास करून प्राविण्य मिळवावे आणि शाळेचे,शहराचे व राज्याचेही नावलौकिकात भर पडेल यासाठी अध्यापक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घ्यावे असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

पी.एम.श्री. पिंपरी चिंचवड मनपा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा म्हेत्रेवाडी क्र. ९२ या शाळेमध्ये आज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. आयुक्त सिंह यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील इनोवेशन लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहेच. पण आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक, भावनिक विकासावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्याचे नियोजन आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर यांनी केले.

आयुक्त सिंह म्हणाले, आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तकांचे वाटप तसेच डी.बी.टी. च्या माध्यमातून शाळा साहित्य वाटपाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे प्रामुख्याने लक्ष देताना विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले जात आहेत. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच भावनिक, सामाजिक प्रगतीकडे देखील लक्ष देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी देखील प्रत्येक शाळेने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळांकडून प्रशासनाला ज्या सूचना येतात, त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पिंपळे निळख येथील शाळेत अतिरिक्त आयुक्तांची भेट

पिंपळे निळख येथील महापालिकेच्या शाळेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा निनाद करीत अतिरिक्त आयुक्तांचे स्वागत केले. त्यानंतर जांभळे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले जात असल्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी आवश्यक उपक्रम घेण्यावर महापालिकेचा नेहमीच भर असतो. आगामी काळात देखील यादृष्टीने विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे, असेही अतिरिक्त आयुक्त पाटील म्हणाले.

………

पी.एम.श्री. पिंपरी चिंचवड मनपा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा म्हेत्रेवाडी क्र. ९२ येथील कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका अनिता रोडगे, मंदाकिनी गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, डी.बी.टी. बँकिंग पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बचेंद्र मलिक, डी.बी.टी. पुरवठादार सनराज प्रिंटपॅकचे राजेश नहार आदी उपस्थित होते.

भोसरी इंग्लिश स्कूल येथील कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका विनिता डीसूझा व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे निळख येथील पीसीएमसी शाळेतील कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका आरती चोंधे, सचिन साठे, नितीन इंगवले, मुख्याध्यापक अण्णा जाधव यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

थेरगाव येथील कार्यक्रमाला महापालिका शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, माजी नगरसेवक तानाजी बारणे, अभिषेक बारणे उपस्थित होते.

काळभोरनगर या कार्यक्रमाला महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, मुख्याध्यापिका वैशाली तवटे, सुजाता इंदूलकर, पुष्पा नेवरे, अर्चना राऊत, पूनम उपरे, शैला लोखंडे, पूजा वंजारी, महेश शिर्के, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, वैशाली काळभोर, विशाल काळभोर, दिलीप दातीर पाटील, गणेश लंघाटे, दत्तात्रय तरासे, महादू नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी नगर हिंदी पीसीएमसी पब्लिक स्कूल (कमला नेहरू) येथील कार्यक्रमासाठी क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अल्पभाषा पर्यवेक्षिका मोमीन हमीदा, माजी नगरसदस्या निकिता कदम, मुख्याध्यापक शंकर पाल यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पीसीएमसी पब्लिक स्कूल वाल्हेकरवाडी मुले क्र. १८/१ येथील कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माजी नगरसदस्य शामराव वाल्हेकर,मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके,माजी नगरसदस्या आशा सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते सचिन वाल्हेकर, बापू म्हस्के, संदीप भालके, नाना शिवले, राणी गोफणे, शेखर चिंचवडे, रुपाली वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा वलटे, शिक्षिका विजया भूतकर, सुनिता पांढरकर, सुजाता पोकळे, रेश्मा मेश्राम, अश्विनी घुगे, नंदिनी खाडे, मंगल राऊत, स्वाती तावरे, गौरी कोल्हापुरे, अनिता महाजन, शिक्षक प्रवीण वैद्य, श्रीकुमार सुतार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……..

विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त सचिन पवार,राजेश आगळे, ममता शिंदे, क्षेत्रिय अधिकारी किरणकुमार मोरे, अमित पंडित, किशोऱ ननवरे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदींनी महापालिकेच्या विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
……….
शाळांमध्ये आकर्षक सजावट;विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याचे औक्षण करून गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येत होते. तसेच शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते,आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
92 %
4.8kmh
100 %
Mon
31 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
33 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!