13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसह - पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसह – पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नातून विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, तसेच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.

या भव्य प्रवेशाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व इतर संघटनांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच घडवून आणले. यामध्ये विशेषतः पिंपरी-चिंचवड, धानोरी-लोहगाव, कोथरूड व खडकवासला परिसरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे या वेळी म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णायक, विकासाभिमुख नेतृत्वामुळे पुणेकरांचा शिवसेनेवरचा विश्वास वाढत आहे. पुणे शहरातील विविध पक्षांच्या संघटनांतून पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रवेशाचा निश्चितच मोठा राजकीय फायदा होईल.”

यावेळी सोनाली मारणे – प्रदेश सचिव, काँग्रेस,गिरीश जैवळ – अध्यक्ष, धानोरी-लोहगाव रेसिडेन्शियल सोसायटी,प्रसन्न पाटील – उपाध्यक्ष धानोरी-लोहगाव रेसिडेन्शियल सोसायटी,आप्पा साठे – वरिष्ठ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), पिंपरी-चिंचवड,राहुल तुपेरे – माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),किरण मारणे – शहर सरचिटणीस, काँग्रेस,प्रमोद बारहाते – अर्बन सेल, राष्ट्रवादी शरद पवार गट,भक्ती गाऱ्हे – अध्यक्ष, सांस्कृतिक सेल, राष्ट्रवादी शरद पवार गट,ओंकार जाधव, मंगलताई पवार, मीनलताई धनवटे, आकाश कुसाळकर, हुसेन चांद्रपहेली – राष्ट्रवादी शरद पवार गट,सारिका जगताप, रेणुका कामन्ना मदार, प्रियंका स्वप्निल चव्हाण, सारिका चोरघडे – महिला विभाग उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट,लक्ष्मीकांत गोनेकर – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी,संदीप मुरारीलाल शर्मा – सचिव, काँग्रेस पुणे शहर,अनिरुद्ध मुरमट्टी – सरचिटणीस, राष्ट्रवादी,शिल्पा तिकोने – काँग्रेस, खडकवासला,अक्षय साठे, प्रथमेश धुमाळ, मंदार मारणे, मनोज पांडे, राजीव सिंग, संतोष पाटोळे, धनराज मुलमे, निलेश धनवटे आदींचा यामध्ये समावेश आहे.

या प्रवेशामुळे पुणे शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत अधिक आक्रमक आणि प्रभावी ताकदीनिशी उतरू शकेल असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!