पुणे: “मराठी नाटकांचा प्रेक्षक हा देशातील सर्वाधिक प्रगल्भ आहे. तो केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर विचारप्रवृत्त होण्यासाठीही नाटक पाहतो,” असे विचार नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘बालगंधर्व महोत्सवा’त ‘नाटकावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे.या संवादात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सहभाग घेतला. पत्रकार आणि समीक्षक राज काझी यांनी या तिघांशी संवाद साधला. कुलकर्णी यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात सामाजिक-साहित्यिक चळवळींमुळे नाटकांचा प्रेक्षक अधिक जाणता झाला आहे. बंगाल आणि महाराष्ट्र वगळता इतरत्र नाटकांचे विषय अद्याप पौराणिक स्वरूपाचे आहेत, याकडे विजय केंकरे यांनी लक्ष वेधले.दामले यांनी सांगितले की, प्रेक्षकांचा कल पटकन रंगमंचीय नाट्यमयतेकडे झुकलेला असतो. नाटकात विषय, लेखन, अभिनय, नेपथ्य यांचा दर्जा महत्त्वाचा असतो आणि माऊथ पब्लिसिटी ही यशासाठी आजही महत्त्वाची आहे. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, मराठी नाट्यसृष्टीतील ६५% उलाढाल ही पुण्यातून होते, तर ग्रामीण भागात नाटकांना संधी न मिळण्यामागे नाट्यगृहांचा अभाव व तारखांची उपलब्धता नसणे हे प्रमुख कारण आहे. नाट्यगृह ऐनवेळी राजकीय कार्यक्रमांसाठी रद्द केल्यास निर्मात्यांचे नुकसान होते, असे सर्वांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस या अडचणींना विरोध करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.
मराठी प्रेक्षक सर्वाधिक प्रगल्भ; नाटक हे विचारप्रवण माध्यम- बालगंधर्व महोत्सवात मान्यवरांचा सूर
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
27.5
°
C
27.5
°
27.5
°
40 %
3.3kmh
0 %
Thu
28
°
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°