29 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ४३,६०३ ट्रॅक्टर ची केली विक्री

सोनालिकाने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ४३,६०३ ट्रॅक्टर ची केली विक्री

पुणे : भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेला सोनालिका ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांच्या अधिक उत्पादकता व समृद्धीसाठी आपल्या शक्तिशाली आणि ट्रॅक्टरद्वारे उद्योगात नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी ओळखली जातो. या दृष्टिकोनामुळे कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत एकूण ४३,६०३ ट्रॅक्टर विक्रीसह विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. ही कंपनीची पहिल्या तिमाहीतील आजवरची सर्वाधिक विक्री आहे. ही मोठी झेप म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी हेवी ड्यूटी ट्रॅक्टर्सद्वारे ‘दम आगे बढ़ने का’ या ब्रँडच्या वचनाला जागण्यासोबतच २०- १२० एचपी ट्रॅक्टर श्रेणीत अद्ययावत तंत्रज्ञान आणि मजबूत अभियांत्रिकी क्षमतेचा पुरावाच आहे.

देशभरात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरीप हंगामाची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली आहे. सोनालिका कंपनी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पिक आणि जमिनीनुसार योग्य ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहे. कंपनीकडे ४०० हून अधिक अनुभवी अभियंते असून ते शेतकऱ्यांच्या प्रत्येक बारीकसारीक सूचनांनुसार आधुनिक व तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टरची रचना करतात. सोनालिकाचा प्रत्येक हेवी ड्यूटी ट्रॅक्टर हा सर्वोच्च दर्जाच्या कसोटीवर तो उतरावा यासाठी अत्याधुनिक रोबोटिक्स व ऑटोमेशन तंत्रज्ञानाने विकसित केला जातो. कंपनीच्या पंजाबमधील होशियारपूर येथील जगातील क्रमांक एकच्या संपूर्णतः एकत्रित ट्रॅक्टर निर्मिती केंद्रात दर २ मिनिटांनी एका नवीन ट्रॅक्टरचे उत्पादन करण्यात येते.

या कामगिरीबद्दल मत व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “आमच्या ‘दम आगे बढ़ने का’ या वचनानुसार आम्ही नेहमीच प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी कार्य करत आलो आहोत. आमच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आम्ही ते वचन पूर्ण करतो. त्यातूनच आम्ही पहिल्या तिमाहीतील विक्रमी अशा आजवरच्या सर्वाधिक ४३,६०३ ट्रॅक्टर विक्रीपर्यंत पोहोचलो आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. यामध्ये आमचा जून महिन्याची आतापर्यंतची सर्वाधिक कामगिरीही समाविष्ट आहे. या वर्षीच्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांमध्ये अगोदरच सकारात्मकता आली असून विक्रमी खरीप पेरणी आणि पिकाच्या आशादायक अंदाजामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आमचे ‘शेतकरी-प्रथम’ हे मूल्य कायम ठेवत तंत्रज्ञान व नवकल्पनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडवून आणण्यासाठी आम्ही पुढेही कार्यरत राहू.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29 ° C
29 °
29 °
32 %
3.5kmh
0 %
Fri
29 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!