33.2 C
New Delhi
Wednesday, August 6, 2025
Homeआरोग्यभारतातील पहिले हृदयासह मूत्रपिंड असे एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

भारतातील पहिले हृदयासह मूत्रपिंड असे एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरीतील ६० वर्षीय रुग्णावर एकाच वेळी हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपण करून जीवदान

  • हृदय व मूत्रपिंड अशा दोन अवयवांचे एकत्रित प्रत्यारोपण करणारे भारतातील पहिले रुग्णालय ठरण्याचा मान डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना

पुणे — भारतीय वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकत, पिंपरी पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी ६० वर्षीय रुग्णावर देशातील पहिली एकाचवेळी हृदयासह मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली . बहु-अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी नव्या वैद्यकीय मानकांची नांदी ठरली आहे.

संबंधित ६० वर्षीय रुग्णाने २००१ मध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेतले होते. मात्र, २०२४ मध्ये त्याचे मूळ प्रत्यारोपित मूत्रपिंड निकामी झाले. त्याचबरोबर डायले‍टेड कार्डिओमायोपथीमुळे त्याच्या हृदयाचे कार्यही अत्यंत क्षीण झाले होते. डायलिसिस व अनेक औषधांवर अवलंबून असलेल्या या रुग्णाने योग्य उपचारासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

रुग्णाच्या परिस्थितीचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा मल्टीडिसिप्लिनरी टीम (Multidisciplinary Team – MDT) यांचा सल्ला घेऊन या अत्यंत जोखमीच्या व गुंतागुंतीच्या केसमध्ये शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. १० जून २०२५ रोजी एका अवयवदात्याच्या साहाय्याने त्याच्यावर एकाच वेळी हृदय आणि पुनः मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.

शस्त्रक्रिया कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पडली. मात्र, शस्त्रक्रियेनंतरचा काळ अत्यंत आव्हानात्मक होता, कारण दोन भिन्न अवयवांच्या प्रत्यारोपणानंतर वेगवेगळ्या प्रतिकारशक्तीनियंत्रणाच्या गरजांमुळे उपचारांमध्ये अत्यंत समन्वय आणि दक्षतेची गरज होती.

रुग्णावर दोन भिन्न अवयवांचे एकत्रित प्रत्यारोपण झाल्यानंतर, उपचारांचा पुढील टप्पा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा होता. दोन्ही अवयवांची प्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार वेगवेगळे असल्यामुळे उपचारांत अचूक समन्वय आणि वैद्यकीय दक्षता अत्यंत आवश्यक होती. या कठीण काळात, डीपीयूच्या बहुविशेषज्ञ वैद्यकीय पथकाने दररोज बैठकांचे आयोजन करून उपचारांची दिशा ठरवली. रुग्णाच्या प्रत्येक प्रतिक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले गेले आणि आवश्यक ते बदल तत्काळ केले गेले. आज, या संयुक्त प्रयत्नांचे फलित म्हणून रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू बरा होत आहे आणि डीपीयू ट्रान्सप्लांट युनिटच्या दक्ष देखरेखीखाली पुनर्प्राप्तीच्या दिशेने पुढे जात आहे.

या यशाबद्दल बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणेचे कुलपती माननीय डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “वैद्यकीय विज्ञान आणि रुग्णसेवा यामध्ये प्रगती साधण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान प्रयत्नांचे हे फलित आहे. एवढी दुर्मीळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. भारताच्या वैद्यकीय इतिहासात या शस्त्रक्रियेने एक महत्त्वाचा ठसा उमटवला आहे.”

मा. डॉ. (सौ.) भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “ही एकत्रित प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय प्राविण्याचेच नव्हे, तर आमच्या संस्थेच्या आशा आणि संवेदनशीलतेवर आधारित मानवी मूल्यांचेही प्रतीक आहे. हे डीपीयू परिवारासाठी अत्यंत अभिमानाचे आणि प्रेरणादायक क्षण आहेत.”

मा. डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे म्हणाले, “डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही आधुनिक आरोग्यसेवेच्या शक्यतांचे नवीन परिमाण शोधण्याचा प्रयत्न करतो. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेप्रती, नाविन्यतेप्रती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यकल्याणासाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”

डॉ. रेखा आर्कॉट अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “या दुर्मीळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे यश हे परिपूर्ण समन्वय, अचूक वैद्यकीय निर्णय आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन यांचे फलित आहे. अशा गुंतागुंतीच्या केसेस आत्मविश्वासाने आणि काळजीपूर्वक हाताळण्याची आमच्या रुग्णालयाची क्षमता यामधून अधोरेखित होते.”

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रक्रियांमध्ये सातत्याने अग्रगण्य भूमिका बजावत असून, भारतातील अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.2 ° C
33.2 °
33.2 °
58 %
4kmh
92 %
Wed
36 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
30 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!