पुणे, : जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वांत मोठे किरकोळ दागिने विक्रेते ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ने पंचतारांकित हॉटेल हयात पुणे येथे त्यांच्या नवीन नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या श्रेणी ‘नुवा बाय माइन डायमंड्स’ या एका विशेष (फक्त आमंत्रितांसाठी) प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले. निवडक ग्राहकांसाठी ‘नुआ, प्रबळतेने चमका’ नावाचा हा कार्यक्रम घेण्यात आला, जो धाडसी स्त्रीत्व आणि आधुनिक कारागिरीचा उत्सव ठरला. डिझाइनच्या उत्कृष्टतेबरोबरच, नुआ कलेक्शनने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि ब्रँड अॅम्बेसिडर करीना कपूर-खान यांच्या शैलीयुक्त मोहिमांद्वारेही ग्राहकांमध्ये आपला खास प्रभाव पाडला आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘सेलिब्रिटी शोस्टॉपर’ म्हणून रॅम्प वॉक करताना उपस्थित सर्वांचे या वेळी लक्ष वेधून घेतले. तिने नुआचे आकर्षक दागिने परिधान केले होते. त्याचबरोबर फॅशन स्टायलिस्ट आयुषी गालाने डिझाइन केलेले ‘पानीहारी’चे खास डिझाइन केलेला पोशाख तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होता. प्राजक्ता माळीच्या बहारदार सादरीकरणाने व्यावसायिक मॉडेल्ससह, सायंकाळच्या मोहकतेत अधिक भर घातली. तसेच बहुमुखी प्रतिभा, व्यक्तिमत्व आणि आधुनिक आकर्षण ही ‘नुआ’च्या संग्रहाची खरी ओळख या वेळी खऱ्या अर्थाने जिवंत झाली.
आयुषी गालाच्या उत्कृष्ट स्टाइलिंगसह, हा कार्यक्रम ‘नुआ’च्या लक्झरी, आधुनिकता आणि भव्यता आदी भावनांचे प्रतिबिंब होता.पनीहारीच्या आधुनिक स्टाईलचा सिल्हूट पोशाख नुआच्या अत्याधुनिक गर्द दागिन्यांच्या डिझाइनशी पूर्णपणे जुळत होता, ज्यामुळे फॅशन आणि उत्तम दागिन्यांचा एक अनोखा मिलाफ पहावयास मिळाला.
‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले की, पुण्यात आमचे ‘नुआ कलेक्शन’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे कलेक्शन प्रत्येकाची मन:स्थिती, प्रसंग आणि पोशाखाशी जुळणारी बहुमुखी प्रतिभा परिभाषित करण्याबरोबरच सुखाचा पुन्हा शोध घेतो. पनिहारी आणि स्टायलिस्ट आयुषी गाला यांच्या सहकार्याने एक आकर्षक असे प्रदर्शन मांडण्यात आले, जे कारागिरी आणि व्यक्तिमत्त्वाचा उत्सव आहे.
नवीन कलेक्शन म्हणजे आधुनिक शैली, स्मार्ट डिझाइन आणि उपयुक्ततेचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामध्ये स्थानिक आवडी-निवडींना अनुरूप बहु-कार्यात्मक डिझाइन तयार केल्या आहेत. यामध्ये अत्याधुनिक स्लिल्हूट आणि अमूर्त डिझाइन्सपासून प्रेरित, नवीन नुआ कलेक्शनमध्ये ‘टू-इन-वन’ रिंग्ज, झिपर-प्रेरित नेकलेस, आधुनिक कानातले आणि फिरत्या बांगड्यांचा समावेश आहे. संग्रहात गुंतागुंतीच्या डिझानसह इटालियन साखळ्याही आहेत ज्या कालसुसंगत आकर्षण वाढवतात. हे दागिने परवडणाऱ्या किमतीत भारतातील आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी असलेल्या सर्व २५० हून अधिक ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’, शोरूममध्ये उपलब्ध आहे.