पुणे, – जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची फाइनल मॅच नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल आणि इनोवेरा स्कूल यांच्यामधील अटीतटीच्या सामन्याने झाली. पहिल्या हाफ मध्ये सुरूवातीच्या काही मिनीटात दोन्ही टीम कडून गोल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतू हा केवळ प्रयत्नच राहिला. दोन्ही टीमकडून झालेल्या उत्कृष्ट खेळीमुळे मॅच ०-० ने संपली. परंतू पेनाल्टी शूट आउट मध्ये ६-७ से बाजी मारून ध्रुव ग्लोबल स्कूल ने सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ जिंकून झोनलसाठी पात्र झाली आहे. फुलगांव येथील मैदानात नुकतीच संपन्न झालेल्या फानइल मॅचचा आनंद शंभर दर्शकांनी घेतला.
या विजयानंतर ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या फाइनल मॅचमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू तरंग गुप्ता ने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या टूर्नामेंट मध्ये खेळाडूंना विशेष पुरस्कार ही देण्यात आले. १५ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाचे ध्रुव ग्लोबल स्कूलकडून कर्णधार वीरेश नाईक यांने नेतृत्व केले. या टीम मध्ये अनीश परातणे, कृष्णा बालवड, रुशील कौल, युवांश सिंग, हदय लोढा, अर्णव उपाध्याय, सिद्धार्थ दुबे, अर्णव कोरे, तरंग गुप्ता, अन्वेश खांडे, पार्थ लांडे, रणवीर जिंदाल, सुब्रमणि मायाप्पनवर, अर्णव महामुने या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंना स्कूलचे प्रशिक्षक अमेय कलाटे व पार्थ सैकिया यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतले.
रोमांचकारी फुटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चॅम्पियनसुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली
New Delhi
clear sky
30.4
°
C
30.4
°
30.4
°
63 %
5.2kmh
9 %
Sun
33
°
Mon
32
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
35
°