31.1 C
New Delhi
Thursday, September 18, 2025
Homeज़रा हट केकोथरुडकरांनो मेट्रोला जायचंय… गाडी कशाला बस वापरा!

कोथरुडकरांनो मेट्रोला जायचंय… गाडी कशाला बस वापरा!

लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी बससेवेसोबतच रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देणार!- ना. पाटील

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे. ना. पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले. लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही ना. पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठलआण्णा बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृशाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यासह उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 2022 पासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे. सदर सेवा सुरु झाल्यापासून पुणेकरांचा वेळ आणि पैसा यामध्येही बचत होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकजण या सुविधेचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

त्यामुळे कोथरुडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा; यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरु करण्यात येत आहे. या सुविधेमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच, कोथरुड मधील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

सदर सेवा सोमवार ते शनिवार सुरु राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार, बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अधुनिक, सुरक्षित आणि आरमदायी सार्वजानिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या पुणे मेट्रोच्या उद्देशास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निवडून दिला जातो. त्यामुळे लोकाभिमुख सेवेची शिकवण असल्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मेट्रोसाठी लास्ट माईल कनेक्टिविटी निर्माण करण्यासाठी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रिक्षा सेवा देखील सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ना. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली पहिली शटल बस सेवा राजाराम पूल- माळवे चौक, वनदेवी- कर्वेनगर, डहाणूकर- कर्वे पुतळा- करिश्मा चौक- एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ वेळेत सुरु असणार आहे. दरम्यान, सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, यासाठी अशा पद्धतीने मोफत शटल बससेवा सुरु करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपक्रमाचे कोथरुडमधून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
62 %
0kmh
20 %
Thu
33 °
Fri
38 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!