Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील (Maharashtra) नागरिकांना घरबसल्या सहज आणि झटपट सरकारी सेवा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एकूण 1100 सरकारी सेवा आता ऑनलाइन (Online) आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापैकी तब्बल 90 टक्के सेवा पुढील दोन महिन्यांत डिजिटल (Digital) होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.
येरवडा येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल, बीएसएनएलचे सरव्यवस्थापक हरिंदर कुमार आणि दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल उपस्थित होते.
गावोगाव पोहोचणार डिजिटल सेवा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील 1100 ऑनलाइन सेवा प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी या कनेक्टिव्हिटीचा मोठा उपयोग होईल. नागरिकांना पारदर्शक, जलद आणि हमी असलेल्या सेवांचा लाभ मिळेल यामुळे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुलभ होईल.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही सांगितले की, “BSNL आता नफ्यात असून स्वदेशी 4G तंत्रज्ञानामुळे डिजिटल भारताकडे महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.”
या डिजिटल सेवांमुळे नागरिकांना बसल्या जागी त्यांच्या अर्जाची माहिती मिळेल. कुठल्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
नागरिकांना होणारे फायदे
घरबसल्या शासकीय सेवा
अर्जाची पारदर्शक माहिती
तक्रारी नोंदवण्याची सोय
आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग आणि बाजाराशी संबंधित माहिती सहज उपलब्ध
स्मार्ट व्हिलेज संकल्पनेला बळकटी
एकूणच, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गावोगाव डिजिटल क्रांती होईल, नागरिकांचा सहभाग वाढेल आणि शेतकरी तसेच सर्वसामान्यांना थेट फायदा मिळेल.
News Title :- Big Announcement for Farmers and Citizens: Chief Minister Devendra Fadnavis.