अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी तर्फे, पुण्यात पुरोहितांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.सिंहगड रोड वरील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात, सुमारे 400 ब्राह्मण पुरोहितांच्या उपस्थितीत पार पडलेला हा नजीकच्या काळातील सर्वात मोठा मेळावा म्हणता येईल.
सर्व धार्मिक,आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुजन मंडळी तसेच पुणे व पुण्याच्या बाहेरील भागातून देखील पुरोहित आवर्जून उपस्थित होते तसेच धार्मिक क्षेत्रातील पूजापाठ करणारे पौरोहित्य गुरुजी , महिला पुरोहित , महिला, युवा व पुरुष कीर्तनकार , वेदपाठ शाळा सदस्य पदाधिकारी , धार्मिक प्रवचनकार , ब्राह्मण भजनी मंडळ सदस्य ,अध्यात्म सदस्य सहभागी झाले.

भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरवात झाली.
पंचांगकर्ते मोहन दाते, प्रसिद्ध मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ देगलूरकर, डॉ गोविंद कुलकर्णी, निखिल लातूरकर, संदीप खर्डेकर इ. प्रमुख पाहुणे उपास्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, तसेच आयोजन समिती मध्ये संतोष वैद्य, केतकी कुलकर्णी, राहुल भाले शास्त्री, अतुल जोशी, उमेश जोशी, श्रीपाद काशीकर, मनीष जोशी, देवेंद्र शूर, किशोर जोशी, दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता.

मोहन दाते यांनी पॉकेट पंचांग 2026 चे औपचारिक प्रकाशन करुन 350 पेक्षा जास्त पंचांग पुस्तिका वाटल्या तसेच आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पंचांगाचे धर्मशास्त्रातील महत्व देखील समजावून सांगितले.
पुरोहितांनी याज्ञाकि करताना आपले धर्म संस्कार, परंपरा यांचा प्रचार, प्रसार करणे देखील आवश्यक आहॆ असे उद्गार डॉ देगलूकर यांनी काढले.डॉ गोविंद कुलकर्णी यांनी, पुरोहितांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महासंघ करत असलेल्या कार्याची माहिती सांगितली.पुरोहितांना मासिक मानधन देण्यात यावे, पुण्यात वेदभवन निर्मिती व्हावी व पुरोहितांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी एका पत्रकाद्वारे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी केली.शांतीपाठ, गीतेचा अध्याय, पुरोहितांच्या मुलांना केलेली शैक्षणिक मदत यांनी कार्यक्रमाची धार्मिकता जोपासली.
प्रास्ताविक आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य यांनी केले,आभार राहुल भाले शास्त्री यांनी मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले.पौरोहित्य व कीर्तन क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले, नियुक्ती पत्रके व महाप्रसादाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
पुरोहित गुरुजी म्हणजे ब्राह्मण समाजाचा कणाच म्हणता येईल व यांच्यासाठी आयोजित केलेला व उत्तम प्रतिसाद लाभल्याने, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला असे म्हणता येईल.