पुणे – ऑल सेट्स हायस्कूल यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्कूल व क्लब क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन माजी आमदार व माजी मंत्री रमेश बागवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या भव्य क्रीडा महोत्सवात २० शाळा आणि ८ क्लब्स यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला जोशपूर्ण रंगत आणली. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळकौशल्य दाखवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. जस्सी जगसिंग, बॉबी मरिअम्मा, शाळेचे संचालक डॉ. जयसिंग डी., ॲलन देवप्रियम, अल्फ्रेड देवप्रियन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत खेळ ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा असल्याचे सांगितले.

या आंतरशालेय स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील संघांनी आपापल्या गटात झुंज देत विजेतेपदासाठी दिलेली झुंज रोमांचक ठरली.
🏅 १० वर्षाखालील गटात – विद्या व्हॅली स्कूल विजेते ठरले,
🏅 १२ वर्षाखालील गटात – पीआयसीटी मॉडेल स्कूल ने विजेतेपद पटकावले,
🏅 १४ वर्षाखालील गटात – रीम्स इंटरनॅशनल स्कूल चमकले,
तर 🏅 १७ वर्षाखालील गटात – पुन्हा एकदा पीआयसीटी मॉडेल स्कूल विजेते ठरले.
या सर्व विजेत्या संघांनी उत्कृष्ट खेळभावना, एकजूट आणि परिश्रमाचे दर्शन घडवले.
मुख्याध्यापिका डॉ. जस्सी जयसिंग यांनी सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हणाल्या,
“खेळ विद्यार्थ्यांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकवतो. आज आपल्या सर्व सहभागी शाळांनी तेच दाखवून दिलं आहे.”

स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शाळेचे संचालक जयसिंग डी. आणि डेव्हिड पिल्ले यांनी सर्व शाळांचे, प्रशिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी म्हटलं,
“या स्पर्धा केवळ स्पर्धा नाहीत, तर पुढील पिढीतील क्रीडा संस्कारांची पायाभरणी आहेत.”
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक सुनील साठे, परवेज शेख, अथर्व पवार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शिस्त, नियोजन आणि टीमवर्कमुळेच या स्पर्धा इतक्या सुंदरपणे पार पडल्याचे क्रीडाशिक्षक साठे यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.