31 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानकेएसबी कंपनी "ग्रेट प्लेस टू वर्क" प्रमाणपत्राने सन्मानित

केएसबी कंपनी “ग्रेट प्लेस टू वर्क” प्रमाणपत्राने सन्मानित

पुणे: पंप,व्हॉल्व्ह आणि संबंधित प्रणाली क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी केएसबी लिमिटेडला जीपीटीडब्ल्यूने (GPTW) “ग्रेट प्लेस टू वर्क”  प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. ही प्रतिष्ठित मान्यता कंपनीची उत्कृष्ट कार्य संस्कृती,पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांचे समाधान दर्शवते. जीपीटीडब्ल्यू(GPTW)ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या अनुभव आणि कार्य संस्कृतीच्या आधारे जगभरातील कंपन्यांचे मूल्यांकन करते.ती विश्वास,पारदर्शकता,स्वच्छता आणि कर्मचारी सहभाग या मूल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांची निवड करते. केएसबीने “KSB Limited is a Great Place to Work”या विधानावर प्रभावी91%गुणमिळवले असून,सर्व मापदंडांवर सरासरी89%गुणप्राप्त केले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकश्री.राजीव जैन,  उपाध्यक्ष – मानव संसाधन (HRD) –आशिया पश्चिम श्री. मोहन पाटील तसेच व्यवस्थापन टीम आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष समारंभात हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान श्री. राजीव जैन यांनी कंपनीच्या मूलभूत मूल्यांबद्दल आणि कामगिरीबद्दल बोलताना सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व सहयोगी आणि प्रगतिशील कार्यसंस्कृतीसाठी सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.  श्री जैन म्हणाले, “ही कामगिरी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वचनबद्धतेचे आणि सहकार्याचे परिणाम आहे. आम्ही नेहमीच असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला आदर,संधी आणि विकासासाठी प्रेरणा मिळेल.”श्री. मोहन पाटील यांनी मजबूत कार्यसंस्कृती विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,केएसबीची‘People-First’ (लोकप्रथम)ही भूमिका कंपनीच्या यशाचा पाया आहे.

ही जीपीटीडब्ल्यू (GPTW)मान्यता सकारात्मक,समावेशक आणि सक्षम कार्यस्थळ निर्माण करण्याच्या केएसबी च्या वचनबद्धतेला आणखी बळकटी देते. हे कंपनीला‘आदर्श नियोक्ता’ (Employer of Choice) म्हणून स्थापित करते आणि कर्मचाऱ्यांच्या सहभाग, कल्याण आणि विकासासाठी तिची सततची वचनबद्धता अधोरेखित करते.

उद्योग,पायाभूत सुविधा आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रांना दशकांपासून नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करणाऱ्या केएसबी लिमिटेडने नेहमीच गुणवत्ता आणि तांत्रिक उत्कृष्टतेवर तसेच मजबूत आणि सकारात्मक कार्य संस्कृतीवर लक्ष केंद्रित केले आहे.केएसबी ने या यशाचे वर्णन त्यांच्या टीमचे सामूहिक यश म्हणून केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31 ° C
31 °
31 °
25 %
3.2kmh
0 %
Sat
31 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!