पुणे : कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. कॉसमॉस बँकेने मंगळवारी झालेल्या लढतीत महेश को-ऑपरेटिव्ह बँकेवर सात विकेटनी मात केली. महेश बँकेने दिलेले ६१ धावांचे लक्ष्य कॉसमॉस बँकेने तीन गडींच्या मोबदल्यात ५.५ षटकांत पूर्ण केले. त्याआधी झालेल्या लढतीत कॉसमॉस बँकेने जनता सहकारी बँकवर आठ गडी राखून मात केली.
धावफलक
१) महेश को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ३ बाद ३० (मनोज शिरोळे ३२, हिमांशू घोडके नाबाद १३, मयुरेश जाधव २-८, रणजित जगताप १-१४) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड – ५.५ षटकांत ३ बाद ६२ (रणजित जगताप २६, निखिल शेवाळे नाबाद २२, सागर सप्रे १-२०, अभिषेक कुलकर्णी १-१०, विजय मंत्री १-११).
२) जनता सहकारी बँक – ८ षटकांत ६ बाद ५८ (अथर्व जोशी नाबाद १९, अनिकेत भागवत १२, रणजित जगताप २-२४, प्रतिक पटवर्धन २-१२) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड – ५.५ षटकांत २ बाद ५९ (रणजित जगताप २८, मयुरेश जाधव नाबाद १९, आशिष शेलार १-१४, अनिकेत भगत १-९).
३) महेश सहकारी बँक लिमिटेड – ८ षटकांत ४ बाद ८६ (हिमांशू घोडके ३४, सागर सप्रे नाबाद २५, सागर बामकर २-१२, प्रमोद धिटे २-१५) वि. वि. सन्मित्र सहकारी बँक लिमिटेड – ८ षटकांत ५ बाद ४० (सूरज बरबडे नाबाद २१, विजय मंत्री २-५).
४) धर्मवीर संभाजी बँक – ८ षटकांत २ बाद ७३ (सचिन कडू नाबाद ३९, स्वप्नील शितोळे १४, सागर १-२०) पराभूत वि. राजश्री शाहू सहकारी बँक – ७.३ षटकांत ४ बाद ७४ (राहुल डी. १९, अजिंक्य खोपडे १७, रोहन बलकवडे १६, स्वप्नील शितोळे २-२६, सचिन कडू १-११).


