14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएंजल वनने गुंतवणूकदारांना फसवणूक करणारे सोशल मीडिया ग्रुप्‍स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबाबत...

एंजल वनने गुंतवणूकदारांना फसवणूक करणारे सोशल मीडिया ग्रुप्‍स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबाबत केले सतर्क

पुणे, २२ नोव्हेंबर २०२५ : एंजल वन लिमिटेड या फिनटेक क्षेत्रातील आघाडीच्‍या कंपनीने गुंतवणूकदारांना एंजल वनच्‍या नावाचा गैरवापर करून आणि त्‍यांचे वरिष्‍ठ अधिकारी असल्‍याचे खोटे सांगत फसवणूक करणाऱ्या सोशल मीडिया ग्रुप्‍सबाबत सतर्क केले आहे.

कंपनीला व्‍हॉट्सअॅप व टेलिग्राम अशा सोशल मेसेजिंग प्‍लॅटफॉर्म तयार करण्‍यात आलेले अनेक अनधिकृत ग्रुप्‍स निदर्शनास आले आहेत, जे एंजल वन लिमिटेडचे ब्रँड नाव व लोगोचा, तसेच त्‍यांच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा व प्रतिष्‍ठेचा बेकायदेशीर व फसवणूक करणाऱ्या पद्धतीने गैरवापर करत आहेत. एंजल वन ने ओळखले आहे की फसवणूक करणारे हे ग्रुप्‍स बेकायदेशीर कृती करत आहेत, जसे आवश्‍यक सेबी नोंदणी/परवानगीशिवाय सुरक्षिततेसंबंधित सल्‍ला किंवा शिफारशी देणे, तसेच सेबीच्‍या मान्‍यतेशिवाय सिक्‍युरिटीजशी संबंधित परतावे व कामगिरीबाबत अनधिकृत दावे करणे.

”आम्‍ही सांगू इच्छितो की, सिक्‍युरिटीज बाजारपेठेत गुंतवणूकीबाबत अनधिकृत सल्‍ला देणे किंवा परताव्‍यांची हमी देणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. आम्‍ही गुंतवणूकदारांना आमच्‍या कंपनीकडून असल्‍याचा दावा करणाऱ्या कोणत्‍याही संवादाची सत्‍यता बारकाईने पडताळून पाहण्‍याचे आवाहन करतो. सखोल संशोधन करत आणि अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार कायदेशीर गुंतवणूक करण्‍याचा निर्णय घ्‍यावा. एंजल वन लिमिटेडचा कोणतेही बनावट अॅप्‍लीकेशन्‍स, वेब लिंक्‍स किंवा खाजगी व्‍हॉट्सअॅप/टेलिग्राम ग्रुप्‍ससोबत प्रत्‍यक्षरित्‍या किंवा अप्रत्‍यक्षरित्‍या कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही आणि फसवणूक करणारे अॅप्‍लीकेशन्‍स किंवा वेब लिंक्‍ससोबत व्‍यवहार केल्‍याने होणाऱ्या कोणत्‍याही आर्थिक नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी जबाबदार नाही,” असे एंजल वन ने सांगितले.

एंजल वनने स्‍पष्‍टपणे सांगितले की कंपनी अनधिकृत सोशल मीडिया ग्रुप्‍समध्‍ये ग्राहकांना सामील करत नाही, मेसेजिंग प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून संवेदनशील वैयक्तिक माहिती देण्‍याची विनंती करत नाही, अनधिकृत चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातून निधी मागत नाही किंवा हमीपूर्ण परताव्‍यांचे आश्‍वासन देत नाही. सर्व कायदेशीर व्‍यवहार फक्‍त एंजल वनच्‍या अधिकृत प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून केले पाहिजेत आणि अधिकृत स्रोतांमधून व अधिकृत अॅप स्‍टोअर्समधून अॅप्‍लीकेशन्‍स डाऊनलोड केले पाहिजेत.

एंजल वन गुंतवणूकदारांच्‍या हितांचे संरक्षण करण्‍याप्रती आणि सुरक्षित ट्रेडिंग पद्धतींना चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. कंपनी सर्व गुंतवणूकदारांना सतर्क राहण्‍यचे आणि आर्थिक नुकसानापासून संरक्षणासाठी आवश्‍यक खबरदारी घेण्‍याचे आवाहन करते.

सर्वांना अशा कंपन्‍यांसोबत व्‍यवहार करण्‍यापासून दूर राहण्‍याचा आणि कायदा अंमलबजावणी संस्‍थांना त्‍वरित कोणत्‍याही संशयास्‍पद क्रियाकलापांची तक्रार करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात येत आहे. तुमच्‍याबाबतीत कोणताही संभाव्‍य घोटाळा झाल्‍यास सायबरक्राइम पोर्टल cybercrime.gov.in च्‍या माध्‍यमातून किंवा हेल्‍पलाइन १९३० शी संपर्क साधत किंवा तुमच्‍या जवळच्‍या पोलिस स्‍टेशनमध्‍ये जाऊन किंवा आम्‍हाला ceoescalation@angelone.in येथे ईमेल करत संबंधित घोटाळ्याची तक्रार करू शकता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!