14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsकार्यकर्त्यांच्या बळावर "अब की बार 100 पार" - शंकर जगताप

कार्यकर्त्यांच्या बळावर “अब की बार 100 पार” – शंकर जगताप

 आमदारपदाची वर्षपूर्ती आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शंकर जगताप यांचा निर्धार

पानी व्यवस्थापन आणि नदी सुधारवर “फोकस” – शंकर जगताप
थेरगावातील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी – : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय जीवनाचा प्रवास 2007 पासून सुरू झाला . त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडत गेल्या.  या जबाबदाऱ्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले.  तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम केले.  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात . यामुळे प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी खंबीरपणे उभा राहिलो . याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ”अब की बार 100 पार” हा नारा आपल्याला पूर्ण करायचा आहे असा निर्धार थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केला. थेरगावच्या याच व्यासपीठावर पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण साजरा करू असा संकल्प देखील या निमित्ताने करण्यात आला.
आमदार शंकर जगताप यांच्या आमदारपदाची  वर्षपूर्ती तसेच पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल थेरगाव, कामगार भवन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मंडलाध्यक्षांच्या तसेच प्रभागातील सदस्यांच्या वतीने आमदार शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले. मेळाव्याला विधान परिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे,  माजी महापौर माई ढोरे,  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तुषार हिंगे,  युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, सचिन साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, स्थायी  समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, ज्येष्ठ उद्योजक उमेश चांदगुडे तसेच भाजपचे सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडळ प्रमुख, मंडल कार्यकारणी सदस्य प्रभाग अध्यक्ष, बुधप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते या निमित्ताने उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांसाठी मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले 

यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.  या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्याला सामोरे जायचे आहे असे सांगून जगताप म्हणाले, की 2007 ते 2012 या कालावधीत मी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला.  या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केले. मात्र 1992 पासूनच  दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासोबत राजकारणाचे धडे गिरवले आहेत. त्यावेळी पडद्यामागे आम्ही काम करत होतो.  लक्ष्मणभाऊ तेव्हा नेहमी म्हणायचे की, ” माझे भाऊ कार्यकर्त्यांप्रमाणे काम करतात आणि कार्यकर्ते मला भावासारखे आहे.” हे वाक्य माझ्या मनात तेव्हापासून अक्षरशः कोरले गेले आहे. कार्यकर्ते माझे पाठीराखे, अगदी माझ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांच्या पाठबळावरच आज हा महत्वाच्या टप्पा मी पूर्ण केला आहे. शंकर जगताप पुढे असेही म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की जो तुमच्यातील गुणांना, कष्टाला आणि तुमच्या प्रामाणिकतेला नेहमीच दाद देतो.  पिंपरी चिंचवड मधील उमा खापरे, अमित गोरखे या कार्यकर्त्यांना आमदार बनवून भाजपने हे सिद्ध केले आहे . तुमच्या सारखे देवदुर्लभ  कार्यकर्ते आहोत. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण 100 सदस्य संख्या नक्की पार करू याची खात्री आहे.  असेही जगताप म्हणाले.  

आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि  नदी सुधारवर ”फोकस” : आमदार जगताप

यावेळी शंकर जगताप यांनी सांगितले, आमदार म्हणून काम करताना नागपूर हिवाळी अधिवेशनात निळी पूररेषा, अनधिकृत बांधकामांचा  प्रश्न उपस्थित करून सरकारला वेळोवेळी नागरिकांच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडले. आरक्षित जागांवरील ताबेदार नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड देण्याची मागणी केली.  ग्राहक सुविधा ,वीजपुरवठा सुधारणा, सांगवी उपविभाग पुनर्रचनेबाबत आवाज उठवला . आमदार आपल्या दारी हा नागरिकांशी थेट संवादात्मक उपक्रम मी हाती घेतला. या  माध्यमातून 13 प्रभागांमधून जवळपास 5 हजाराहून अधिक प्रश्न सोडविले. राज्य व  केंद्र सरकारच्या ताब्यातील रस्त्यांच्या कामाबाबत वेळोवेळी आढावा घेतला . हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अपघात नियंत्रणावर ठोस उपाययोजनांबाबत मागणी केली आहे.  वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत येथील राष्ट्रीय महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीबाबत आढावा बैठक घेतली.  महामार्गावर सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी निविदा मंजूर करून घेतली असून आज सेवारस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे .  प्रस्तावित भक्ति शक्ति  ते रावेत, वाकड, भोसरी, मोशी ते चाकण असा मेट्रोचा डीपीआर शासनाला दिला आहे. या कामांमुळे लवकरच वाहतूककोंडीचा प्रश्न कायम मिटेल असा मला विश्वास आहे. याशिवाय आता २०५१ ची लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून ७६० एम.एल.डी अतिरिक्त पाणी साठा उचलण्याबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.  एस.टी. महामंडळासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आगार, शहरात विविध ठिकाणी अर्बन स्ट्रीट प्रकल्प उभारायचे  आहेत.  पवना, मुळा, इंद्रायणी नदी संवर्धनसाठी माझे प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. या तीनही नद्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे.  यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून यामुळे आगामी काळात चिंचवडचा चेहरा मोहरा बदलणार आहे. 
 ————————————————————
 कार्यकर्त्यांच्या संघटनातून पालिका निवडणूक यशस्वी करू

भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे काम करणाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विश्वासाने संधी दिली. या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चिंचवड विधानसभा प्रभारी तसेच शहराध्यक्ष म्हणून काम करताना मी एक लाख 61 हजार सदस्य नोंदणी केली. जिल्ह्यातील नोंदणीचा हा उच्चांक होता.  त्यामुळे पक्षाने पिंपरी चिंचवड निवडणूक  प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हे काम माझ्या एकट्याचे नव्हते.  याच्यामध्ये तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनीच हातभार लावला. आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे संघटन महत्त्वाचे आहेत या दृष्टीने पुढे काम करायचे आहे. याच संघटनाच्या माध्यमातून पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण थेरगाव मधील याच मंचावर साजरा करून असा संकल्पही या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!