पुणे – : प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) यांच्या वतीने भारत-जपान बिझनेस मीटचे आयोजन शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत पुण्यातील क्राउन प्लाझा येथे करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उद्योन्मुख उद्योजकांसाठी प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (पीसीसीआय)चा शुभारंभ ही करण्यात येईल. अशी माहिती पीसीसीआयचे अध्यक्ष, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्टकॉन चे व्यवस्थापकीय भागीदार डॉ. भगवान गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पीसीसीआयचे संचालक आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे चे संस्थापक आणि सीईओ प्रा. दीपक बागडे, एलबीएमआयएफएल आणि एलबीएफएल आणि पीसीसीआय चे संचालक अॅड. ओमप्रकाश मौर्य व पीसीसीआय आणि व्यावसायिक महिला, पुणे च्या संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड उपस्थित होत्या.
या परिषदेला टोकियो येथील व्हानेज लिमिटेडचे सीईओ डॉ. प्रमोद वाहने हे भारत-जपान व्यावसायिक सहकार्यावर मुख्य भाषण देतील. तसेच टोकियो येथील ग्रीन रिन्यूएबल एनर्जी इंकचे सीईओ एन.डोवाकी हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. १० राज्यातील ४५ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या ४५ दिवसीय आर्थिक सशक्तिकरण अभियानाची माहिती ही येथे देण्यात येणार आहे.
ही शिखर परिषद बिल्डिंग ब्रिजेसःइंडिया-जपान बिझनेस कोलॅबोरेशन या थीम वर आधारित असून तंत्रज्ञान, गुंतवणुक आणि नवोन्मेषामध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणणार आहे. परिषदेत शाश्वत भागीदारीवर तज्ञ पॅनेलबरोबर चर्चा करण्यात येईल. त्याच प्रमाणे शाश्वत भागीदारीतील दहा उद्योजकांचे स्टार्टअप प्रदर्शन आणि हरित ऊर्जा, आरोग्य सेवा, कौशल्य विकास आणि महिला उद्योजकतेवरील सत्रांचा समावेश आहे.
यावेळी प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड (एलबीएफएल) – ग्रामीण आणि अर्ध-शहरी भांडवली गरजा पूर्ण करणारी प्रस्तावित (एनबीएफसी) आणि होम बेठे डिजिटल व्यापार संधीसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आर्थिक सशक्तिकरण अभियानाचे शिल्पकार डॉ. भगवान गवई यांनी सांगितले की, ही शिखर परिषद भागीदारी निर्माण करणाच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. जपानी तांत्रिक उत्कृष्टता ही भारतीय उद्योजकीय उर्जेला पूरक आहे. तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व समावेशक भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम सर्व क्षेत्रांमध्ये आणि समुदायांमध्ये आर्थिक संधींचे लोकशाहीकरण करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनासह सतत सुधारणा करण्याच्या जपानच्या कैझेन तत्वज्ञानाशी सुसंगत आहे.


