17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोलिसने सादर केला नवीन सोलिसजेपी ९७५ ट्रॅक्टर

सोलिसने सादर केला नवीन सोलिसजेपी ९७५ ट्रॅक्टर

             

भारतातील ‘विकसित किसान’ला सक्षम करण्यासाठी बनवलेला सोलिस जेपी ९७५ मध्ये असामान्य ऑपरेशनल आराम आणि श्रेणीतील अव्वल वैशिष्ट्यांसाठी अभूतपूर्व तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण  


पुणे,  :
 इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचा (आयटीए) प्रमुख ब्रँड आणि भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोलिसने आज सर्वांत नवीन सोलिस जेपी ९७५ हा ट्रॅक्टर सादर करून भारतीय शेती तंत्रज्ञानात एक मोठी झेप घेण्याची घोषणा केली आहे. पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर विकसित केलेला जेपी ९७५ हा प्रगतीशील भारतीय शेतकऱ्यांसाठी उच्च कार्यक्षमतेच्या, इंटेलिजंट आणि अॅप्लिकेशन-रेडी ट्रॅक्टरच्या नवीन युगाची सुरुवात आहे. भारतातील ‘विकसित किसान’ ला सक्षम करण्यासाठी बनवविण्यात आलेल्या सोलिस जेपी ९७५ मध्ये विविध शेतीकामांमध्ये उच्च उत्पादकतेला चालना देण्यासाठी असामान्य ऑपरेशनल आराम आणि श्रेणीतील अव्वल वैशिष्ट्यांसाठी अभूतपूर्व तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

भारतीय शेतीसाठी कामगिरीचा नवीन मापदंड
नवीन सोलिस जेपी ९७५ च्या केंद्रस्थानी प्रगत जेपी टेक ४-सिलेंडर इंजिन असून ते हेवी-ड्युटी कामांमध्ये २०५ एनएमपर्यंत पोहोचून सुलभ कामगिरीसाठी १० टक्के जास्त टॉर्क देते. या शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षम इंजिनाला या विभागातील भारतातील पहिल्या १५एफ+५आर एपिसाइक्लिक ट्रान्समिशनची जोड मिळाली आहे. तसेच सुलभ हाताळणीसाठी साइड-शिफ्ट गीअर्स आणि प्रत्येक महत्त्वाच्या कामाला योग्य अशा किमान ५ इष्टतम कार्यरत गती (वर्किंग स्पीड्स) आहेत.

सोलिस जेपी ९७५ ट्रॅक्टरमधील स्मार्ट शटल सिस्टीममुळे जलद आणि झटकारहित दिशात्मक बदलाची सुनिश्चिती होते.  त्यामुळे शेती तसेच लोडरच्या कामात ऑपरेटरची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढते. मजबूत अशा शिडीसारख्या चेसिसमुळे स्थिरता, कमी कंपन आणि कमी आवाजाची सुनिश्चिती होते, दीर्घकाळ कामासाठी ते महत्त्वाचे ठरते.

या ऐतिहासिक लाँचबद्दल बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “प्रगत अशा सोलिस जेपी ९७५ चे लाँचिंग हे भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पुढील पिढीचे ट्रॅक्टर तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. जेपी ९७५ हे आमच्या पूर्णपणे नवीन जेपी मालिकेतील पहिले मॉडेल असून ते भविष्यासाठी तयार असलेल्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेले आहे. प्रगतीशील भारतीय शेतकऱ्यांच्या विकसित गरजांशी इंटेलिजंट अभियांत्रिकीची त्यात सांगड घातली आहे.

शक्तिशाली जेपी टेक ४-सिलेंडर इंजिन आणि त्याच्या वर्गातील भारतातील पहिल्या १५एफ+५आर ट्रान्समिशनसह, जेपी ९७५ शक्ती, आराम आणि वापराच्या वैविध्यामध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित करतो. पुढील १२ महिन्यांत, आमच्या शेतकरी समुदायासाठी अधिक कार्यक्षमता आणि उत्पादकता अनलॉक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या प्रगत ट्रॅक्टरची मालिका आम्ही सादर करणार आहोत.” 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!