MPSC Group B Preliminary Exam | नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी दि. २१ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. त्याच दिवशी एमपीएसीच्या पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमदेवार संभ्रमात पडले होते.
यासंदर्भात एमपीएससीने परीक्षा त्याच दिवशी होणार की पुढे ढकलणार, याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी उमेदवारांनी केल होती. या सर्व पार्श्वभूमीवर एमपीएससीने आज परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार ह्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित तारखेनुसार, दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. आता ही पूर्व परीक्षा ४ जानेवारी व ११ जानेवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


