मिड-मार्केट रेट ट्रॅव्हल कार्ड आता उपलब्ध; परदेशी प्रवासाची संख्या विक्रमी ३.८९ कोटी झाली.
मुंबई,- : वाईजने आज भारतात त्यांचे मल्टी-करन्सी ट्रॅव्हल कार्ड लाँच केले आहे. देशात आतापर्यंतच्या परदेशी प्रवासाच्या उच्चांकी आकडेवारीची नोंद होत असताना आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हंगामाची सुरूवात होत असतानाच हे कार्ड लाँच झाले आहे.
भारतात परदेशी प्रवासामध्ये २०२४ मध्ये विक्रमी ३.८९ कोटी डिपार्चर्सची नोंद झाली. यामध्ये लीझर ट्रॅव्हल (४२.५ टक्के), डायस्पोरा भेटी (३४.७ टक्के) आणि व्यावसायिक सहली (१४.९ टक्के) यांचा वाटा मोठा होता.तसेच खर्चात आणखी नाट्यमय वाढ झाली असून आर्थिक वर्ष २०२२ पूर्वी, भारतीय लोक परदेशातील सुट्ट्यांवर दरवर्षी सुमारे ३-४ अब्ज डॉलर्स खर्च करत होते, परंतु गेल्या दोन वर्षांत हा आकडा सरासरी १७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे.
प्रवासात ही तेजी आलेली असतानाही, पारंपारिक फॉरेक्स पुरवठादारांकडून विनिमय दरावर लावण्यात आलेल्या अपारदर्शक शुल्कामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारतातील फॉरेक्स कार्ड बाजारपेठेत बँका आणि ट्रॅव्हल कंपन्यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे, त्यातील बहुतांश प्रदाते चलन विनिमयात २-४ टक्के मार्जिन जोडतात – हा खर्च ग्राहकांना क्वचितच स्पष्टपणे सांगितला जातो. या छुप्या शुल्कामुळे ₹ २ लाख परकीय चलनाच्या विनिमयावर प्रवाशांना मध्यम बाजार दराच्या तुलनेत रुपये ४,०००-रुपये ८,००० जास्त खर्च येऊ शकतो.
आजपासून उपलब्ध होणाऱ्या वाईज ट्रॅव्हल कार्डमध्ये गुगलवर दिसणाऱ्या मिड-मार्केट एक्सचेंज रेटचा वापर करण्यात येतो. त्यात केवळ किरकोळ, पारदर्शक विनिमय शुल्क असेल. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये जाहीर झालेल्या वाईज ट्रॅव्हल कार्ड वेटलिस्टमध्ये फक्त एका महिन्यात ७५,००० हून अधिक लोक सामील झाले आहेत. पारंपारिक फॉरेक्स कार्ड्सना पर्यायी पारदर्शक कार्डची मागणी त्यातून प्रतिबिंबित होते.
वाईजने भारतीय लोक प्रत्यक्षात कसे प्रवास करतात आणि खर्च करतात यानुसार या कार्डची रचना केली आहे :
● ४० हून अधिक चलनांना मान्यता : भारतातील कोणत्याही फॉरेक्स कार्डवर उपलब्ध असलेला हा सर्वात मोठा आकडा असून व्हिएतनाम, इंडोनेशिया, तुर्की आणि जॉर्जिया यांसारख्या प्रमुख प्रवास स्थळांचा त्यामध्ये समावेश आहे.
● डिजीलॉकर आणि व्हिडिओ केवायसी : शाखेत न जाता काही मिनिटांत डिजिटल ऑनबोर्डिंग पूर्ण करा.
● इन्स्टंट डिजिटल कार्ड : प्रत्यक्ष कार्ड पाठवण्यात येत असतानाच ऑनलाइन बुकिंग आणि व्यवहारांसाठी त्वरित उपलब्ध.
● आयएमपीएस टॉप-अप्स: त्वरित अकाऊंट लोडिंग.
● स्मार्ट कन्वर्जन : तुमच्या कार्डमध्ये गंतव्य चलन नसले तरीही, परदेशात खर्च करताना कार्ड स्वयंचलितपणे सर्वोत्तम उपलब्ध दर निवडते.
● रिअल-टाइम नियंत्रणे : अॅपमध्ये त्वरित कार्ड फ्रीझ आणि अनफ्रीझ करा, खर्चाचे अॅलर्ट प्राप्त करा आणि कस्टम खर्च मर्यादा निश्चित करा.
● व्हिसा नेटवर्कवर १६०+ देशांमध्ये काम करते : जगभरात लाखो व्यापारी आणि एटीएमवर स्वीकारले जाते.
● दरमहा एटीएममधून २०० डॉलरपर्यंत मोफत पैसे काढता येणार : त्या मर्यादेच्या बाहेर १.४० अमेरिकी डॉलर अधिक ३.२५ टक्के शुल्क लागू.

वाईजच्या दक्षिण आशिया विस्तार प्रमुख तनेया भारद्वाज म्हणाल्या, “भारतीय प्रवासी विक्रमी संख्येने परदेशात जात आहेत, परंतु ते अजूनही छुपे शुल्क भरत आहेत, त्यामुळे प्रत्येक ट्रिपमध्ये शेकडो किंवा हजारो रुपये खर्च होऊ शकतात. प्रतीक्षा यादीतील या आकड्यांवरून आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली, की लोकांना गुंतागुंतीच्या किंमतींचा उबग आला आहे. त्यांना पारदर्शकता, सुविधा आणि उत्पादनाचा उत्तम अनुभव हवा आहे. प्रवास हंगाम सुरू होत असतानाच आंतरराष्ट्रीय खर्चासाठी भारतामध्ये हे सादर आम्हाला आनंद होत आहे.”
वाईजने १० फेब्रुवारी २०२६ पूर्वी साइन अप करणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांचे निश्चित असे कार्ड जारी करण्याचे ४६० रुपये शुल्क रद्द केले आहे. या कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क, सदस्यता शुल्क किंवा निष्क्रियता दंड लागू होणार नाही.


