23.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
HomeTop Five Newsफुटबॉलचा राजा मेस्सीच्या हस्ते मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेव’चे भव्य उद्घाटन! 

फुटबॉलचा राजा मेस्सीच्या हस्ते मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेव’चे भव्य उद्घाटन! 

सचिनकडून खास जर्सी भेट

Lionel Messi visit Mumbai and meet Sachin Tendulkar : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला भेट दिली. येथील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

सचिन तेंडुलकर आणि सुनील छेत्रींसोबत ऐतिहासिक भेट –

क्रिकेट आणि फुटबॉल विश्वातील दिग्गज एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने हा क्षण अधिकच अविस्मरणीय ठरला. वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीची भेट ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत झाली. या खास प्रसंगी भारतीय फुटबॉल स्टार सुनील छेत्री देखील उपस्थित होता. जेव्हा मेस्सी, सचिन आणि छेत्री हे तिन्ही महान खेळाडू एकत्र आले, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांसाठी तो एखाद्या स्वप्नपूर्तीसारखा क्षण होता. या तिन्ही दिग्गजांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.

या खास भेटीदरम्यान सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला २०११ च्या विश्वचषकाची टीम इंडियाची जर्सी भेट दिली, ज्यावर सचिनची स्वाक्षरी (ऑटोग्राफ) देखील होती. या दोन्ही दिग्गजांनी एकत्र छायाचित्रे काढली. याला उत्तर म्हणून मेस्सीने सचिन तेंडुलकरला एक फुटबॉल भेट दिला. हा क्षण दोन्ही खेळाडूंमधील परस्पर आदर आणि क्रीडा भावनेचे शानदार उदाहरण ठरला. कार्यक्रमादरम्यान मेस्सीने त्याचे सहकारी रोड्रिगो डी पॉल आणि लुईस सुआरेझ यांच्यासह लहान मुलांसोबत ‘रोंडो’ खेळण्याचा आनंद घेतला.

मैदानावरील मेस्सीचे मुलांसोबतचे हे सहज संवाद आणि त्यांना खेळाच्या बारकावे शिकवणे चाहत्यांना खूप भावले. मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकात्यातून झाली होती. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात मात्र सुरक्षेच्या त्रुटींमुळे प्रचंड गोंधळ झाला होता. यानंतर हैदराबादमधील कार्यक्रम यशस्वी झाला. मुंबईतील ऐतिहासिक कार्यक्रमानंतर आता मेस्सी आपल्या भारत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
43 %
3.6kmh
8 %
Wed
25 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!