मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला दिशा मिळण्याची व्यक्त केला विश्वास
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः पुरंदर आणि लगतच्या तालुक्यांमध्ये सरकारकडून दर्जेदार विकासकामांचे जाळे उभारण्यात आल्यामुळे पुरंदर व इतर तालुक्यांच्या विकासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून पुरंदरवासीयांनी राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले आहेत.
यासाठी गोकुळ दहीहंडी उत्सव समितीचे आनंद संजय जगताप आणि केपी फाउंडेशनचे अभिषेक राजमाने यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आभार परिषदेचे आयोजन शिवाजीनगर,पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांचज्या योजना योग्य आणि जल्द गतीने कार्यान्वित केल्या बद्दल सार्वजनिक बांधकाम पुणे यांचे मुख्य अभियंता श्री राहणे साहेब यांचे विशेष कौतुक करण्यात आले, तसेच त्यांचे नेतृत्वात कार्यरत असलेले दक्षिण विभागाचे अधीक्षक अभियंता बाविस्कर व कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी यांचे ही आभार व्यक्त करण्याचा ठराव करण्यात आला, त्यावेळी समस्त पुरंदर, वेल्हा, मुळशी भागातील ग्रामस्थ तसेच सायक्लॉथॉन चे स्पर्धक तसेच संयोजक इत्यादी उपस्थित होते.
मागील 25 वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना दोन-तीन वर्षापासून गती प्राप्त झाली आहे. पुरंदर विमानतळाचे काम लवकरच सुरू होत आहे. तसेच पुरंदरसह भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांमध्ये रस्त्यांचे दर्जेदार जाळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात आले आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे, असा विश्वास आभार परिषदेत व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सायक्लोथॉन स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा फायदा ही स्थानिक नागरिकांना होणार असल्यामुळे त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार ज्येष्ठ नेते श्री संजय काका जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी, कंत्राटदार यांचे देखील तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.


