31.9 C
New Delhi
Sunday, August 2, 2026
Homeमनोरंजनस्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी रंग, गाणी आणि आनंदाची उधळण केली.

‘तिघी’मध्ये ज्येष्ठ, स्वाभिमानी आणि स्वतंत्र स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या भारती आचरेकर यांच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. उतारवयात स्वावलंबाने आणि स्वाभिमानाने जगणे हा मुद्दा या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘मातोश्री ओल्डएज होम’मधील स्वावलंबी व स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक आपल्या राहाण्याचा खर्च स्वतः उचलतात आणि तिथे घरासारखीच आपुलकी, सन्मान आणि स्वातंत्र्य अनुभवतात. वृद्धाश्रम हा असहायतेचे नाही, तर स्वावलंबनाचा पर्याय असू शकतो, हा मुद्दा ‘तिघी’ ठळकपणे मांडतो.

याच विचाराला अनुसरून ‘तिघी’ची टीम पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’मध्ये होळी साजरी करण्यासाठी पोहोचली. यावेळी भारती आचरेकर ज्येष्ठांसोबत गाणी गायल्या, सर्वांनी मिळून सात्विक पद्धतीने, पर्यावरणपूरक रंगांमध्ये होळी साजरी केली. गुलालाच्या हलक्या रंगांमध्ये आणि मनमोकळ्या गप्पांमध्ये ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहाण्यासारखा होता.

यावेळी भारती आचरेकर म्हणाल्या, “आपण अनेकदा वृद्धाश्रमाकडे केवळ सहानुभूतीने पाहातो. मात्र, हा निर्णय कमकुवतपणाचा नसून स्वाभिमानाचा असतो. त्यांना स्वतंत्रपणे, स्वतःच्या अटींवर जगायचे आहे. येथे येऊन मला जाणवले की, इथे घरासारखे वातावरण आहे, प्रेम आहे, सन्मान आहे आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान आहे. आज त्यांच्यासोबत होळी साजरी करताना मनापासून आनंद झाला.”

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
58 %
2.9kmh
100 %
Sun
36 °
Mon
37 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments