19.6 C
New Delhi
Friday, January 9, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानब्रेक्स इंडियाच्या रेव्हिया'चे  उच्च कार्यक्षमतेचे  क्लचेस केले सादर

ब्रेक्स इंडियाच्या रेव्हिया’चे  उच्च कार्यक्षमतेचे  क्लचेस केले सादर

ब्रेक्स इंडियाच्या रेव्हियाचे उच्चकार्यक्षमतेचे क्लचेस केले सादर

पुणे, : ब्रेक्स इंडियाने रेव्हिया’ क्लचेस सादर करून आपल्या मोबिलिटी सोल्यूशन्स पोर्टफोलिओचा शानदार विस्तार केला आहे.  भारतातील विविध ड्रायव्हिंग परिस्थितीत व्यावसायिक वाहने, ट्रक आणि बसेसच्या कामगिरीच्या बिकट गरजा पूर्ण करण्यासाठी या क्लचेसची रचना करण्यात आली आहे.


उंची फ्रिक्शन मटेरियल्स आणि रिनफोर्स्ड स्प्रिंग तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या रेव्हिया’ क्लचेसमध्ये दमदार टिकाऊपणा, श्रेष्ठ उष्णता शोषण (हीट डिसिपेशन) आणि सातत्यपूर्ण पॉवर ट्रान्समिशन मिळते. जड वजन, तीव्र चढउतार, दाट शहरातील रहदारी आणि लांब पल्ल्याच्या ऑपरेशन्समध्येसुद्धा हा लाभ मिळतो.


कमी झीज आणि दीर्घ सेवा आयुष्यासाठी त्यांची रचना करण्यात आली असून या क्लचमुळे फ्लीट ऑपरेटर्सना डाउनटाइम कमी करण्यास, देखभाल खर्च कमी करण्यास आणि वाहन अपटाइम जास्तीत जास्त करण्यास मदत होते.


“रेव्हिया’ क्लच प्लेट्ससोबतच चाकाभोवतीच्या महत्त्वाच्या उत्पादनांना कव्हर करण्याच्या आपल्या धोरणात ब्रेक्स इंडियाने आणखी एक निर्णायक पाऊल उचलले आहे. ब्रेक सिस्टीमपासून ते क्लचपर्यंत आम्ही भारतासाठी सर्वांगीण मोबिलिटी उत्पादनांच्या आमच्या वचनाला बळकटी आणत आहोत. वाहन थांबवण्यासाठी जे असते त्यासाठी आमची दीर्घकाळापासून ओळख आहे, तोच विश्वास आम्ही त्याला चालवणाऱ्या गोष्टींपर्यंत वाढवत आहोत,” असे ब्रेक्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आफ्टरमार्केट बिझनेस युनिटचे प्रमुख श्री. एस. सुजित नायक यांनी सांगितले.

 
क्लच प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये:
· सुरळीत संबंध आणि विच्छेद (एंगेजमेंट व डिसएंगेजमेंट)
· उच्च टॉर्क ट्रान्समिशन कार्यक्षमता
· टिकाऊपणा आणि दीर्घायुष्य
· उत्कृष्ट (औष्णिक) थर्मल प्रतिरोधकता
· ओईएम (OEM) मानके पूर्ण करण्यासाठी उत्पादित.


सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ऑटोमोटिव्ह सिस्टीममधील दशकांच्या कौशल्याच्या बळावर रेव्हिया’ क्लचेस भारतीय बाजारपेठेसाठी विश्वासार्ह, उच्च-गुणवत्तेचे घटक ऑफर करण्याच्या आपल्या कटिबद्धतेला बळकटी देत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
19.6 ° C
19.6 °
19.6 °
15 %
0.5kmh
1 %
Fri
20 °
Sat
21 °
Sun
21 °
Mon
21 °
Tue
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!