15.7 C
New Delhi
Saturday, January 10, 2026
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ RSS स्वयंसेवक विजय नरहर रेडे यांचे निधन

ज्येष्ठ RSS स्वयंसेवक विजय नरहर रेडे यांचे निधन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच निवृत्त शासकीय अधिकारी श्री. विजय नरहर रेडे (वय ८५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ४ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्यातील सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.विजय रेडे यांनी १९८१ साली खडकीतील रेंज हिल्स परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू करून संघविस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. अनेक वर्षे ते संघकार्याशी निष्ठेने जोडलेले राहिले. शिस्त, सेवाभाव आणि संघटन कौशल्यासाठी ते परिचित होते. निवृत्तीनंतरही ते सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेक स्वयंसेवकांवर पडला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक संघकार्याशी जोडले गेले, असे संघपरिवाराकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांचे ते वडील होत.विजय रेडे यांच्या निधनाने पुण्यातील संघपरिवारासह सामाजिक क्षेत्रात एक निष्ठावंत, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
15.7 ° C
15.7 °
15.7 °
30 %
1.9kmh
1 %
Fri
15 °
Sat
21 °
Sun
21 °
Mon
21 °
Tue
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!