मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांअंतर्गत राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारी मतदान तर 7 फेब्रुवारीला होणार निकाल जाहीर.
निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. काल (१३ जानेवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी सांगितले की,
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, तेथे निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील **१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार?
राज्यातील खालील १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे —
कोकण विभाग :
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे विभाग :
पुणे
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर
मराठवाडा विभाग :
छत्रपती संभाजीनगर
परभणी
धाराशिव
लातूर


