१०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे तळागाळातील एआय नवप्रयोग सादर
पुणे, १४ जानेवारी २०२६: पुण्यातील डीवाय पाटील विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ओपनआय अकॅडमी × नेक्स्टवेव्ह बिल्डथॉनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील १,००० पेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र आले. त्यातून भारतातील उगवत्या एआय प्रतिभेची गहनता समोर आली. या ४८ तासांच्या जेनआय एआय स्पर्धेत ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी संघांनी भाग घेतला, शहरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या प्रादेशिक एआय बिल्डथॉनपैकी हा एक ठरला.
संजय घोडावत युनिव्हर्सिटी, वासीरेड्डी वेंकटैय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एनआयएटी, एडीवायपीयू इत्यादी संस्थांमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या ४८ तासांच्या बिल्डथॉनमध्ये भाग घेतला, त्यातून भारताच्या पुढील पिढीमध्ये एआय प्रतिभेच्या तत्परतेनं स्वीकार अधोरेखित झाला.

ओपनआय अकॅडमी × नेक्स्टवेव्ह बिल्डथॉन हा जानेवारीत होणाऱ्या इंडिया-एआय इम्पॅक्ट २०२६ याच्याशी संलग्न प्री-समिट कार्यक्रम आहे. ही समिट इंडियाएआय मिशन अंतर्गत भारत सरकारच्या वतीने आयोजित प्रमुख जागतिक एकत्रीकरण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारताच्या नेतृत्वाचा वेग वाढविणे हे त्याचे लक्ष्य आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियाएआय उपक्रमाच्या अनुषंगाने या बिल्डथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, व्यवसाय आणि सार्वजनिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी क्षमतेचा शोध घेण्यासाठी तरुण प्रयोगकर्त्यांना सक्षम करणे हे त्याचे लक्ष्य आहे.
कार्यक्रमात बोलताना, डाटा टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, ईपीएम सिस्टम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले, “वास्तव जगाचा संदर्भ व प्रत्यक्ष बांधणी यांची सांगड घालून उद्योगासाठी सज्ज असलेल्या प्रतिभेला आकार देण्यासाठी ओपनआय अॅकॅडमी × नेक्स्टवेव्ह बिल्डथॉनसारखे उपक्रम कळीचे ठरतात. समर्थ, शाश्वत एआय प्रतिभेचा दमदार प्रवाह निर्माण करण्याचा हा भारताचा मार्ग आहे.”
नेक्स्टवेव्हचे सीईओ व सह-संस्थापक राहुल अत्तुलुरी म्हणाले, “प्रादेशिक बिल्डथॉनच्या माध्यमातून पुण्यासारख्या उगवत्या तंत्रज्ञान क्षेत्रांमधील छुप्या प्रतिभेपर्यंत पोहोचणे आम्हाला शक्य झाले आहे. यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना वास्तविक जगातील नाविन्यपूर्ण एआय प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यासपीठ, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळतो. देशभरात ७०,००० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या चळवळ म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता नाविन्यपूर्ण एआय प्रयोगांना चालना देणारे शक्तिशाली व्यासपीठ बनले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या आकांक्षा व करिअरला एआय नवीन आकार कसा देत आहे, याचे प्रतिबिंब विविध प्रादेशिक केंद्रांवरील ४८ तासांच्या जेनआय स्पर्धांमधून पडते. नेक्स्टवेव्हमध्ये आमच्यासाठी बिल्डथॉन हा एआय शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा मार्ग आहे. भारताच्या एआय व्यवस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि जागतिक एआय प्रतिभेची पुढील लाट भारतात निर्माण होत आहे, याचा हा पुरावा आहे.”
पुण्याच्या प्रादेशिक फेरीमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये बेरोजगारी, शिक्षण व आरोग्यसेवा यांवर अधिक भर देण्यात आला. विविध क्षेत्रांमधील वास्तव जगातील आव्हानांचा उपयोग कसा करता येतो, हे त्यातून अधोरेखित झाले. शारीरिक प्रयत्न कमी करणारी एआय आधारित हजेरी व ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, स्वयंचलित मूल्यांकनासह ऑनलाईन प्रश्नमंजूषा व परीक्षा प्लॅटफॉर्म, वैयक्तिक शिफारसी करणारे स्मार्ट ट्रॅव्हल प्लॅनर्स, आरोग्यसेवा सुधारणारे डॉक्टरच्या अपॉईंटमेंट बुकिंग टूल्स, रिअल-टाईम हवामान अंदाज अॅप्लिकेशन, उत्तम वित्तीय नियोजनासाठी एक्सपेन्स ट्रॅकर, सर्वांगीण ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, सुरक्षित ऑनलाईन मतदान प्रणाली, रिअल-टाईम चॅट अॅप्लिकेशन, नोकरी देणाऱ्यांना प्रतिभेशी जोडून देणारे जॉब पोर्टल्स, खाद्यपदार्थ ऑर्डरिंग उत्पादन, उत्पादकतेवर केंद्रित टास्क मॅनेजमेंट टूल्स आणि आपत्काळात रक्तदाते व रुग्णालय आणि रुग्णांना जोडणारे रक्तदान व्यवस्थापन प्लॅटफॉर्म यांचा लक्षणीय नाविन्यपूर्ण प्रयोगांमध्ये समावेश होता.
प्रादेशिक फेरीनंतर ओपनआय अकॅडमी × नेक्स्टवेव्ह बिल्डथॉन आता ग्रँड फिनालेच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. तिथे राज्य पातळीवरील क्वालिफायर्स जानेवारीत एकमेकांशी स्पर्धा करतील. यात निवडलेल्या टीम्स थेट ओपनआय अकॅडमीकडे कल्पना सादर करतील आणि त्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग जागतिक पातळीवर सादर करतील. यातून जागतिक एआय व्यवस्थेत भारताच्या उपस्थितीला आणखी वाव मिळेल.


