40.9 C
New Delhi
Sunday, June 21, 2026
Homeमनोरंजनतिहाई महोत्सवातून पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक आदरांजली

तिहाई महोत्सवातून पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक आदरांजली

१७ जानेवारी रोजी एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात रंगणार मैफल

पुणे, : महान संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथी अ शततंत्री मीडिया यांच्या वतीने ‘तिहाई महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात संतूर, सारंगी, खरताल, मृदुंग आणि तबला या वाद्यांची जुगलबंदी ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

येत्या शनिवारी, १७ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात ही अनोखी मैफल होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि प्रसिद्ध संतूर वादक पं. मदन ओक यांची आहे. या मैफिलीचे निवेदन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत.

‘भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात ‘तिहाई’ या शब्दाला एक विशेष वलय आहे. याच संकल्पनेतून ‘तिहाई – द हेरिटेज ऑफ इंडियन आर्ट्स अँड म्युझिक’ या महोत्सवाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा जगभरात पोहोचावा, या उद्देशाने २०१४ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधून सुरू झालेला हा प्रवास आता माझ्या मायभूमीत, म्हणजेच पुण्यातून भारतात पदार्पण करणार आहे,’ अशी माहिती पं. मदन ओक यांनी दिली.

‘हा महोत्सव म्हणजे केवळ एक सांगीतिक कार्यक्रम नसून, महान संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली आहे. संतूरला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारे माझे गुरू पं. शिवकुमार शर्मा आणि तबल्यावरील प्रभुत्वाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसेन या जोडीने संगीत विश्वात एक सुवर्णयुग निर्माण केले. या दोन दिग्गजांनी संतूर आणि तबल्याचा अजरामर स्वरसंवाद घडवला. तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न ‘तिहाई’ महोत्सव करत आहे,’ असे ओक यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध तबला वादक उस्ताद फझल कुरेशी आणि पं. मदन ओक यांची तबला आणि संतूर वादनाची जुगलबंदी रंगणार आहे. पं. शिवकुमार शर्मा आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संतूर व तबला वादनाच्या अनेक मैफली गाजल्या आहेत. या दोघांच्या मैफलींची आठवण ताजी करणारी मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दिलशाद खाँ (सारंगी), खेटे खाँ (खरताल), अनंतकृष्णन (मृदुंग) आणि उस्ताद फझल कुरेशी (तबला) यांची भारतीय आणि पाश्चात्य वादनाची मैफल रंगणार आहे. झाकीर हुसेन यांनी ‘मास्टर्स ऑफ पर्कशन’च्या माध्यमातून तालवाद्यांचे प्रयोग जागतिक स्तरावर नेले. त्याचीच झलक या मैफलीतून अनुभता येणार आहे. या महोत्सवासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून, www.madanoak.com या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. ‘रसिकांनी मोठ्या संख्येने या मैफलीला यावे,’ असे आवाहन ओक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
40.9 ° C
40.9 °
40.9 °
19 %
4.8kmh
61 %
Sun
41 °
Mon
39 °
Tue
41 °
Wed
39 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments