मुंबई- मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मधील मतमोजणीतुन महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे हे या प्रभागातून विजयी झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर पराभूत यांचा पराभव केला आहे.
समाधान सरवणकर यांचा निशिकांत शिंदे यांनी 582 मतांच्या फरकाने आघाडीवर घेत निकाल आपल्या बाजूने वळवत यश मिळवले आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा पराभव निश्चित झाला आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत चित्र स्पष्ट होत असून या प्रभागात ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळत असल्याचे सध्याचे कल दर्शवत आहेत


