20.1 C
New Delhi
Sunday, February 1, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानओप्पो इंडियाने प्रीमियम रेनो१५ सिरीज केली लाँच

ओप्पो इंडियाने प्रीमियम रेनो१५ सिरीज केली लाँच

उत्साही प्रवाशांसाठी डिझाइन केलेल्या ओप्पो रेनो १५ प्रो ५जी आणि ओप्पो रेनो १५ प्रो मिनी ५जी मध्ये विविध प्रवासी फोटोग्राफीसाठी बनवलेला २०० एमपी अल्ट्रा-क्लीअर मेन कॅमेरा विशेष आकर्षण आहे.

पुणे, : ओप्पो इंडियाने आज त्यांची प्रीमियम रेनो१५ सिरीज लाँच केली, त्यामध्ये रेनो१५ प्रो, रेनो१५ प्रो मिनी आणि रेनो१५ ही तीन प्रकारची विशेष आकर्षणे आहेत. तरुण प्रवासी आणि उत्साही फोटोग्राफरसाठी तयार केलेल्या या सिरीजमध्ये प्रगत कॅमेरा सिस्टम, बुद्धिमान एआय आणि अचूक डिझाइनचे मिश्रण आहे. नैसर्गिक घटकांनी प्रेरित रंगीत फिनिश आणि अशा प्रकारच्या पहिल्या प्रकारच्या होलोफ्यूजन तंत्रज्ञानासह, रेनो१५ सिरीजमध्ये कॉम्पॅक्ट, एर्गोनॉमिक फॉर्म फॅक्टर आणि दणकट बिल्ड क्वालिटी आहे. रेनो१५ प्रो आणि रेनो१५ प्रो मिनी २०० एमपी कॅमेरासह फोटोग्राफीला पुढे जात असून त्यामध्ये स्तंभित करणारी क्लॅरिटी आहे. त्याच्या जोडीला ५० एमपी ३.५ एक्स ऑप्टिकल झूम लेन्स, १२० एक्स पर्यंत डिजिटल झूम, प्युरटोन इमेजिंग टेक्नॉलॉजी आणि एआय एडिटिंग टूल्सही आहेत.

रेनो१५ सिरीजच्या लाँचबद्दल बोलताना ओप्पो इंडियाचे कम्युनिकेशन्स प्रमुख गोल्डी पटनायक म्हणाले, “भारतात १० कोटींपेक्षा अधिक ओप्पो वापरकर्ते आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा प्रीमियम अनुभवांच्या दिशेने, विशेषतः कॅमेरा सिस्टम, अंतर्ज्ञानी एआय, विशिष्ट डिझाइन भाषा आणि वापरकर्ता अनुभवाच्या दिशेने, कशा विकसित झाल्या आहेत हे आम्ही जवळून अनुभवले आहे. रेनो सिरीजची सातत्यपूर्ण वाढ ही या ट्रेंडसाठी आमची कटिबद्धता आहे कारण ग्राहक किरकोळ अपग्रेडपेक्षा वास्तव जगातील मूल्य देणारी उपकरणांच्या शोधात आहेत. रेनो१५ सिरीजद्वारे आम्ही त्या विश्वासावर उभारी घेत असून लक्षणीयरीत्या प्रगत इमेजिंग सिस्टम, सखोल एआय क्षमता आणि मजबूत अष्टपैलू कामगिरी देत आहोत. तरुण भारतीय कसे प्रवास करतात, त्यांचे क्षण कसे तयार करतात आणि कॅप्चर करतात यानुसार त्यांची रचना करण्यात आली आहे.”

रेनो१५ प्रो हा समुद्राला द्रवरूप सोन्याच्या चादरीत बदलणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळेसच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सोनेरी रंगछटांनी प्रेरित अशा सनसेट गोल्ड रंगात आणि चहा व कॉफीच्या उबदारतेमध्ये मूळ असलेल्या कोको ब्राउन रंगात येतो. रेनो१५ प्रो मिनीमध्ये कोको ब्राउन रंग कायम आहे. त्यात होलोफ्यूजन तंत्रज्ञान आणि क्रिस्टल पिंक प्रकाराद्वारे साध्य केलेला त्रिमितीय रिबन पॅटर्न हे खास आकर्षण असलेला ग्लेशियर व्हाइट रंग आणि आणि क्रिस्टल पिंक प्रकाराची भर पडली आहे. रात्रीचे आकाश आणि ऑरोरासारख्या घटनांमधून प्रेरणा घेतलेल्या ग्लेशियर व्हाइट, ट्वायलाइट ब्लू आणि ऑरोरा ब्लूसह रेनो१५ची लाईनअप पूर्ण होती.

किंमत आणि उपलब्धता*
रेनो१५ प्रोच्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६७,९९९ रुपये आणि १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आहे. रेनो१५ प्रो मिनी १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये आणि १२जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. दरम्यान, रेनो१५ तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे, ८ जीबी + २५६ जीबी ४५,९९९ रुपये, १२ जीबी + २५६ जीबी ४८,९९९ रुपये आणि १२ जीबी + ५१२ जीबी ५३,९९९ रुपये.

ओप्पो रेनो१५ सीरीज अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मेनलाईन रिटेल आऊटलेट्स आणि ओप्पो ई-स्टोरमध्ये आकर्षक ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध असेल.

● निवडक बँक भागीदारांसह क्रेडिट कार्डवर आणि यूपीआय व्यवहारांवर १० टक्के पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक* मिळवा.
● सर्व आघाडीच्या फायनान्सर्सकडून १५ महिन्यांपर्यंत शून्य डाउन पेमेंट योजनांचा लाभ घ्या.
● आघाडीच्या ट्रेड इन पार्टनर्ससह २ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवा
● कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय १८० दिवसांचे स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन मिळवा.
● १ वर्षाची विस्तारित वॉरंटी
● प्रत्येक रेनो १५ मालिकेच्या खरेदीवर ओप्पो एन्को बड्स ३ प्रो+वर ५० टक्के सूट मिळवा

रेनो १५ सी हा ८ जीबी + २५६ जीबी मध्ये ३४,९९९ रुपयांना आणि १२ जीबी + २५६ जीबी मध्ये ३७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

ओप्पोचा पॅड ५ आणि एन्को बड्स ३ प्रो+ सह इकोसिस्टमचा विस्तार
आजच्या लाँचमध्ये, ओप्पोने ओप्पो पॅड ५ आणि ओप्पो एन्को बड्स ३ प्रो+ या दोन नवीन इकोसिस्टम उत्पादनांची घोषणा केली.

ओप्पो पॅड ५ मध्ये परावर्तन (रिफ्लेक्शन) कमी करतानाच तीक्ष्ण दृश्ये देणारा मोठा १२.१-इंचाचा २.८ के अँटी-ग्लेअर मॅट डिस्प्ले आहे. त्यामुळे तो दीर्घ वाचन आणि पाहण्यासाठी आरामदायी ठरतो. विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी बनवलेल्या हा टॅबलेटमध्ये एआय-संचालित नोट-टेकिंगची सुविधा आहे, त्यामुळे सुटसुटीतपणा सोपी होते आणि उत्पादकता वाढते. याच्या १०,०५० एमएएच ची विशाल बॅटरीमुळे वारंवार चार्जिंगशिवाय काम, शिक्षण आणि मनोरंजनासाठी दीर्घकाळ वापर सुनिश्चित होते. ओप्पो पॅड ५ हा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलसाठी रुपये २६,९९९ आणि ८ जीबी + २५६ जीबी ५जी प्रकारासाठी रुपये ३२,९९९.

त्यासोबतच, ओप्पो ने ओप्पो एन्को बड्स 3 प्रो+ सादर केला आहे, इमर्सिव्ह साउंड आणि दीर्घ बॅटरी लाईफला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी तो डिझाइन केलेला आहे. हे इअरबड्स १२.४ मिमी एक्स्ट्रा-लार्ज ड्रायव्हरसह सुसज्ज असून ते सखोल बास आणि स्पष्ट ऑडिओ पुरवतात. ते एकूण ५४ तासांपर्यंत प्लेबॅक देतात आणि त्यात आयपी ५५ धूळ आणि पाण्याच्या प्रतिकार आहेत. त्यामुळे ते वर्कआउट्स, प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी योग्य ठरतात. एकंदर, ओप्पो पॅड ५ आणि ओप्पो एन्को बड्स ३ प्रो+ हे ओप्पो च्या इकोसिस्टमचा विस्तार करतात, ते व्यावहारिक वैशिष्ट्ये, विश्वासार्ह कामगिरी आणि आधुनिक जीवनशैलीसाठी अखंड समग्रता देतात. ओप्पो एन्को बड्स ३ प्रो+ ची किंमत २,४९९ रुपये असून ते ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि मुख्य रिटेल आउटलेट्समध्ये उपलब्ध असेल.

रेनोचा पहिला प्रो मिनी: तडजोड न करता कॉम्पॅक्ट
रेनो१५ प्रो मिनीमध्ये ६.३२-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि अल्ट्रा-स्लिम १.६ मिमी साइड बेझल्ससह कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये फ्लॅगशिप परफॉर्मन्स येतो. याची जाडी ७.९९ मिमी आणि वजन फक्त १८७ ग्रॅम असून यात एक शक्तिशाली, पाम-फ्रेंडली अनुभव मिळतो, तो कोणत्याही तडजोडशिवाय वापरता येतो. रेनो१५ मध्ये ६.५९-इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९३.४ टक्के आहे. त्याचे ट्वायलाइट ब्लू आणि ग्लेशियर व्हाइट व्हेरियंटमध्ये मोजमाप ७.७७ मिमी आणि ऑरोरा ब्लूमध्ये ७.८९ मिमी आहे. सर्व व्हेरियंटचे वजन सुमारे १९७ ग्रॅम असून ते स्क्रीनचा आकार आणि दैनंदिन सोईस्करता यांच्यात योग्य संतुलन साधते.

अल्ट्रा-स्लिम डिझाइन, अल्ट्रा-स्मूथ व्ह्यूइंग
हातात असताना स्लिम, हलकेपणा आणि आरामदायकता ठेवून एक इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव देण्याच्या दृष्टीने रेनो१५ सिरीज डिझाइन केलेली आहे. रेनो१५ प्रो मध्ये ६.७८-इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून त्यामध्ये चारही बाजूंनी अल्ट्रा-थिन १.१५ मिमी बेझल आहेत, त्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९५.५ टक्के एवढा होतो. त्याची स्क्रीन विस्तृत असूनही, त्याची जाडी फक्त ७.६५ मिमी आहे आणि वजन अंदाजे २०५ ग्रॅम आहे. यामुळे प्रीमियम तरीही संतुलित अनुभव मिळतो.

संपूर्ण लाइनअपमध्ये, अॅमोलेड पॅनल्स एफएचडी+ रिझोल्यूशन, १०-बिट रंग आणि १२० एच झेड पर्यंत अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. यामुळे ते सहज स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी वापरता येतील, तर स्थिर वापरादरम्यान पॉवर वाचवण्यासाठी ती बुद्धिमानपणे कमी करता येईल. उजेडाच्या सर्व परिस्थितींमध्ये स्पष्टतेसाठी ब्राइटनेस स्वयंचलितपणे समायोजित होते, प्रो मॉडेल्समध्ये ती आऊटडोअरला स्थानिक पीक ब्राइटनेससह १,८०० निट्स पर्यंत पोहोचते.

स्टुडिओ-क्वालिटी एडिटींग झाले सोपे
रेनो१५ सिरीजमध्ये एआय एडिटर ३.० सादर करण्यात आले आहे. त्यातून फोटो एडिटिंग सोपे आणि अधिक इन्ट्यूटिव्ह बनविण्यासाठी ओप्पोच्या ऑन-डिव्हाइस क्रिएटिव्ह टूलकिटचा विस्तार करण्यात आला आहे. एआय पोर्ट्रेट ग्लो हा त्याचा गाभा असून तो प्रत्येक दृश्याचे बुद्धिमत्तेने विश्लेषण करतो आणि नैसर्गिक प्रकाश, फ्लॅश प्रकाश, रिम प्रकाश किंवा स्टुडिओ प्रकाश यासारख्या सर्वात योग्य प्रकाश शैली स्वयंचलितपणे लागू करतो. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही पोर्ट्रेट संतुलित आणि आकर्षक दिसतात.

ओप्पोच्या विद्यमान एआय फोटोग्राफीच्या शक्तिस्थानांवर ही सीरीज एआय रिकम्पोज, एआय परफेक्ट शॉट, एआय लाईव्हफोटो २.०, एआय बेस्ट फेस, एआय अनब्लर, एआय स्टुडिओ, एआय रिफ्लेक्शन रिमूव्हर आणि एआय इरेजर यांसारखी परिचित साधने देत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सहजतेने मोमेंट्सचे परिष्करण, वर्धन, आणि रीफ्रेमिंग करणे शक्य होते. ही वैशिष्ट्ये एकत्रितपणे एक अखंड, एआय-फर्स्ट एडिटिंग अनुभव प्रदान करतात, ती वापरकर्त्यांना कमीत कमी प्रयत्नात शेअर-रेडी परिणाम मिळविण्यास मदत करते.

अखंड सर्जनशीलतेसह सिनेमॅटिक ४के व्हिडिओ
सतत फिरतीवर असताना शूटिंग करणाऱ्या क्रिएटर्ससाठी ओप्पो रेनो१५ प्रो ५जी आणि ओप्पो रेनो १५ प्रो मिनी ५जी हे फ्रंट, मेन, अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो कॅमेऱ्यांमध्ये ६०एफपीएस पर्यंत ४ के एचडीआर व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. एच़डीआर रेकॉर्डिंग हायलाइट्स आणि शॅडो दोन्हीमध्ये तपशील जतन करते, विविध प्रकाश परिस्थितींमध्ये नैसर्गिक रंग आणि संतुलित कॉन्ट्रास्टसह फुटेज प्रदान करते. सर्व फोकल लेंथसह ४के ६०एफपीएस एचडीआर सह, रेनो १५ प्रो सीरीजमुळे क्रिएटर्सना अधिक सर्जन आणि संपादनाच्या लवचिकतेची मुभा मिळते. क्रिएटर्स सातत्यपूर्ण रिझोल्यूशन, फ्रेम रेट आणि डायनॅमिक रेंजसह वाइड शॉट्स आणि क्लोज-अप दरम्यान सहजपणे स्विच करू शकतात किंवा एकाच क्षणात अनेक कोन कॅप्चर करू शकतात. यामुळे रंग, एक्सपोजर किंवा मोशनमध्ये अचानक बदल न होता सुरळीत एडिटिंग आणि दृश्य सातत्याची सुनिश्चिती होते. यामुळे जलद-वेगवान शूटिंग आणि पोस्ट-प्रोडक्शन वर्कफ्लोसाठी ती आदर्श ठरते.

सुधारित अल्ट्रा-स्टीडी व्हिडिओ सिस्टममुळे चालताना किंवा गतिशीलपणे चित्रीकरण करताना फुटेज स्थिर ठेवण्यास मदत होते. सर्व कॅमेऱ्यांमध्ये इटीएस २.० स्थिरीकरणाला सपोर्ट आहे, त्यामध्ये हँडहेल्ड रेकॉर्डिंग करताना किंवा हालचाल करताना होणारे शेक्स कमी करण्यासाठी मुख्य आणि टेलिफोटो कॅमेऱ्यांवर ऑप्टिकल इमेज स्थिरीकरण आहे. क्रिएटर्स रेकॉर्डिंग करताना पुढील आणि मागील कॅमेऱ्यांमध्ये सहजपणे स्विच करू शकतात. एक्सपोजर आणि रंग बदल कमी करण्यासाठी दोन्हीवर सुसंगत ऑप्टिमायझेशन लागू केले जाते. सोनेरी फोकल-लेन्थ पर्सपेक्टिव्हसह ट्यून केलेला ०.६एक्स अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा, चेहरे नैसर्गिक ठेवत दृश्याचा अधिक भाग कॅप्चर करतो. प्रगत अल्गोरिदम कमी प्रकाशात स्पष्टता वाढवतात, बॅकलिट दृश्ये संतुलित करतात आणि स्किन टोन स्थिर राखतात— ते व्लॉग आणि लोकांवर केंद्रित व्हिडिओसाठी आदर्श आहेत.

याशिवाय, ड्युअल-व्ह्यू व्हिडिओसारख्या वैशिष्ट्यांमुळे लवचिक स्प्लिट-स्क्रीन लेआउटसह एकाच वेळी फ्रंट आणि रियर रेकॉर्डिंग शक्य होते, तर मल्टी-आउटपुट कॅप्चरमुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान कोणत्याही व्यत्ययाशिवाय फोटो किंवा मोशन शॉट्स घेता येतात. ओप्पो रेनो १५ ५जी मध्ये व्हिडिओ एडिटिंग २.० मुळे ट्रिमिंग, स्पीड कंट्रोल्स, ट्रांझिशन, बीट-सिंक्ड एडिट्स आणि उच्च-गुणवत्तेच्या निर्यातीसह डिव्हाइसवर जलद एडिटिंग शक्य होते. यात हाय-फ्रेम-रेट एचडीआर व्हिडिओ आणि मोशन फोटो सपोर्ट समाविष्ट आहे.

चार्ज कमी करा, जास्त वापरा.
रेनो१५ सिरीज दीर्घकाळ आणि जास्त वापरासाठी डिझाईन केलेली आहे. रेनो १५ प्रोमध्ये ६५०० एमए एच बॅटरीची पॉवर आहे, त्यामध्ये ८०डब्ल्यू सुपरवूक जलद चार्जिंग आणि ५० डब्ल्यू एअरवूक् वायरलेस चार्जिंग आहे. ती केबल-फ्री चार्जिंगच्या सोयीसह संपूर्ण दिवस विश्वसार्ह कामगिरी देते. एका १० मिनिटांच्या जलद चार्जिंगमध्ये ५ तासांपर्यंत व्हाट्सअप, ४.३ तास यूट्यूब किंवा ४.५ तास इन्स्टाग्रामचा वापर मिळतो. त्यामुळे लहान चार्जिंग ब्रेकसुद्धा खरोखर प्रभावी ठरतात. एखादा ० ते १०० टक्के पर्यंत पूर्ण चार्ज करण्यासाठी अंदाजे ५१ मिनिटे लागतात. रेनो १५ मध्ये ६५०० एमएएच ५ वर्षांची टिकाऊ बॅटरीसुद्धा आहे, तर रेनो१५ प्रो मिनी मध्ये ६२०० एमएएच बॅटरी आहे. या दोन्हींमध्ये ८० डब्ल्यू सुपरवूक जलद चार्जिंग आहे, त्यामुळे बॅटरीचे दीर्घकालीन आरोग्य कायम राखतानाच जलद चार्जिंग गतीची हमी मिळते,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
52 %
2.6kmh
40 %
Sun
22 °
Mon
25 °
Tue
24 °
Wed
25 °
Thu
25 °

Most Popular

Recent Comments