21.1 C
New Delhi
Thursday, March 19, 2026
HomeTop Five Newsमुळा–मुठा नदी प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल!

मुळा–मुठा नदी प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल!

पुण्यातील तीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे अंतिम टप्प्यात

पुणे : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा–मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणारा PARMM (Pollution Abatement of River Mula-Mutha) प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे (STP) उभारण्याचे काम सुरू असून, त्यासोबत मुख्य मलवाहिन्या (मिसिंग लिंक्स) विकसित केल्या जात आहेत.

हा प्रकल्प केंद्र शासनाचे राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या कामासाठी Enviro Control and Toshiba Water Solutions JV या ठेकेदाराला ३ मार्च २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

सध्या ११ पैकी मुंढवा (२० एमएलडी), वारजे (२८ एमएलडी) आणि वडगाव (२६ एमएलडी) येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या तीन केंद्रांची एकत्रित क्षमता ७४ एमएलडी इतकी आहे. या ठिकाणी इलेक्ट्रो-मेकॅनिकल उपकरणांची ड्राय रन चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच वेट टेस्ट घेण्यात येणार आहे. आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जातील.

मुंढवा येथील २० एमएलडी केंद्रात हांडेवाडी, मोहम्मदवाडी, काळेपडळ, ससाणेनगर, माळवाडी, मगरपट्टा, हडपसर औद्योगिक वसाहत आदी भागांतील मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. येथे आधीच ४५ एमएलडी क्षमतेचे केंद्र अस्तित्वात असून त्यासोबत नव्याने २० एमएलडी केंद्र उभारण्यात आले आहे.
वारजे येथील २८ एमएलडी केंद्रात वारजे व रामनगर परिसरातील मैलापाणी प्रक्रिया होणार आहे, तर वडगाव येथील २६ एमएलडी केंद्रात रायकर मळा, धायरी, जांभुळवाडी, नन्हे आणि आंबेगाव परिसरातील मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

याशिवाय हडपसर मत्स्यबीज केंद्रातील ७ एमएलडी आणि खराडी येथील ३० एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण केंद्रांचे ड्राय रन व ट्रायल टेस्ट पुढील दोन महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन आहे. उर्वरित पाच केंद्रांची कामे २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने १४ जानेवारी २०१६ रोजी ९९०.२६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून, यामध्ये केंद्र शासनाचा ८५ टक्के (८४१.७२ कोटी) आणि पुणे महानगरपालिकेचा १५ टक्के (१४८.५४ कोटी) वाटा आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ११७३ कोटी रुपये असून, आतापर्यंत केंद्र शासनाकडून ६२१.४५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. आजपर्यंत प्रकल्पावर ८४४.४५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

PARMM प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेची एकूण मैलापाणी प्रक्रिया क्षमता ८९५ एमएलडी इतकी होणार असून, यामुळे मुळा–मुठा नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १५ वर्षे देखभाल व दुरुस्ती ठेकेदारामार्फत केली जाणार असून, त्यासाठी ३००.२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण योजनेचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
2.6kmh
75 %
Thu
30 °
Fri
22 °
Sat
29 °
Sun
32 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments