41.9 C
New Delhi
Wednesday, June 24, 2026
HomeTop Five Newsपीएम श्री केंद्रीय विद्यालय, देहू रोड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पीएम श्री केंद्रीय विद्यालय, देहू रोड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे : पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २, आयुध निर्माणी, देहू रोड येथे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

विद्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सी. एस. चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून करण्यात आली. त्यानंतर ध्वजगीत सादर करण्यात आले. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी भाषण केले तसेच देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनी श्रव्या आणि हुस्ना यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांवर प्रकाश टाकला.

यानंतर प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर आनंदी व उत्साही झाला. प्राचार्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना देशप्रेम, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरम् गायन आणि मिठाई वाटपाने करण्यात आली.

यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयुध निर्माणी परिसरात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. येथे विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च-पास्ट, योग प्रात्यक्षिके, प्राथमिक वर्गाचा अ‍ॅक्शन साँग, पारंपरिक लेझीम सादरीकरण तसेच माध्यमिक वर्गाचे समूह नृत्य सादर केले. या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ झाली, अशी प्रतिक्रिया पालक व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
41.9 ° C
41.9 °
41.9 °
18 %
5.1kmh
13 %
Wed
40 °
Thu
43 °
Fri
44 °
Sat
44 °
Sun
44 °

Most Popular

Recent Comments