23.1 C
New Delhi
Friday, May 8, 2026
HomeTop Five Newsचार दिवस अखंड सूरसाधना!

चार दिवस अखंड सूरसाधना!

पुण्यातील व्हिपी म्युझिक अकॅडमीने १,१११ गीतांचा जागतिक विक्रम रचला

भारतीय संगीतसाधनेचा जागतिक पातळीवर गौरव करणारी अभूतपूर्व कामगिरी पुण्याच्या व्हिपी म्युझिक अकॅडमीने करून दाखवली आहे. सलग ९६ तासांत तब्बल १,१११ गाणी सादर करत अकॅडमीने इंग्लंडस्थित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स संस्थेकडे आपले नाव विश्वविक्रम म्हणून नोंदवले आहे. असा पराक्रम करणारी ही जगातील पहिलीच म्युझिक अकॅडमी ठरली आहे.

या ऐतिहासिक संगीत महोत्सवाला २३ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीगणेश मंत्राने सुरुवात झाली. चार दिवस आणि चार रात्री अखंड सुरू राहिलेला हा सूरमहोत्सव २७ जानेवारी रोजी सकाळी ११:११ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या संपूर्ण काळात संगीताची शिस्त, साधना आणि भक्ती यांचा अद्वितीय अनुभव उपस्थितांना मिळाला.

या विक्रमात १३ ते ७१ वयोगटातील एकूण १११ गायकांनी सहभाग घेतला. वय, अनुभव आणि गायनशैली वेगवेगळी असतानाही सर्वांनी समन्वयाने आणि नियमांचे काटेकोर पालन करत सादरीकरण केले. मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा समावेश असलेल्या १,१११ गाण्यांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

या उपक्रमाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे आणि प्रशिता पांडे यांनी केले. त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि संगीतशिस्तीमुळेच हा कठीण विक्रम शक्य झाल्याची भावना सहभागी कलाकारांनी व्यक्त केली.

इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स संस्थेच्या वतीने शेखर शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी परीक्षक म्हणून सलग ९६ तास कार्यक्रमावर बारकाईने निरीक्षण ठेवले. प्रत्येक गाण्याची वेळ, नोंद आणि नियमांचे पालन याची सखोल तपासणी झाल्यानंतर हा विश्वविक्रम अधिकृतपणे मान्य करण्यात आला.

व्हिपी म्युझिक अकॅडमीचा हा विक्रम केवळ एक संगीत विक्रम नसून, भारतीय सांस्कृतिक परंपरा, सामूहिक मेहनत आणि संगीतसाधनेचा जागतिक सन्मान असल्याची भावना पुण्याच्या संगीतविश्वातून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
23.1 ° C
23.1 °
23.1 °
78 %
4.1kmh
20 %
Fri
37 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
43 °
Tue
40 °

Most Popular

Recent Comments