35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
HomeTop Five Newsग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स मधील सीएमए ची धोरणात्मक भूमिका अधोरेखित करणारी राईज इंडिया...

ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स मधील सीएमए ची धोरणात्मक भूमिका अधोरेखित करणारी राईज इंडिया लीडरशिप समिट

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांच्या वतीने पुणे येथे “RISE इंडिया लीडरशिप समिट” चे आयोजन करण्यात येणार असून, या परिषदेची संकल्पना “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील धोरणात्मक नेतृत्व : मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs” अशी आहे. या परिषदेच्या माध्यमातून GCCs ची बदलती भूमिका आणि कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) यांचे वाढते धोरणात्मक योगदान अधोरेखित करण्यात येणार आहे. अशी माहिती ICMAI चे करिअर काऊन्सेलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला CMA चैतन्य मोहरीर, सचिव – ICMAI-WIRC तसेच CMA श्रीकांत इप्पलपल्ली, अध्यक्ष – ICMAI पुणे चॅप्टर आदि मान्यवर उपस्थित होते. ही समित   उद्या (30 जानेवारी 2026 रोजी) हॉटेल विवांता, पुणे येथे सायंकाळी 4 ते रात्री 8 या दरम्यान होणार आहे.   

ICMAI चे करिअर काऊन्सेलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन यांनी सांगितले की, ICMAI कडून केवळ GCCs साठी आयोजित करण्यात येणारी ही पहिलीच परिषद आहे. पूर्वी GCCs प्रामुख्याने खर्च नियंत्रण व आर्थिक अहवालांपुरते मर्यादित होते; मात्र आजच्या घडीला त्यांच्याकडून धोरणात्मक नियोजन, कार्यप्रदर्शन व्यवस्थापन, जोखीम प्रशासन (रिस्क गव्हर्नन्स) आणि डिजिटल क्षमतांचा प्रभावी वापर अपेक्षित आहे. या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी CMAs अत्यंत सक्षम आहेत.

CMAs कडे खर्च व नफा विश्लेषण, धोरणात्मक नियोजन, कार्यप्रदर्शन मोजमाप आणि निर्णय सहाय्य (Decision Support) यांचे सखोल ज्ञान असल्याने ते जागतिक CFOs आणि व्यवसाय नेत्यांसाठी महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार ठरत आहेत. मार्जिन ऑप्टिमायझेशन, फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन, अॅनालिटिक्स, गव्हर्नन्स तसेच ESG-संलग्न निर्णयप्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांत CMAs ची भूमिका अधिक ठळकपणे दिसून येत आहे.

या समिटला विविध आघाडीच्या GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFOs आणि HR प्रमुख उपस्थित राहणार असून, उद्योग संवाद आणि नेतृत्वात्मक चर्चेसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments