32.1 C
New Delhi
Friday, April 3, 2026
Homeक्रीड़ायंदाचा क्वाड्रानगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

यंदाचा क्वाड्रानगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

पुणे – अतिशय प्रतिष्ठित अशा क्वाड्रंगुलर गोल्फ टूर्नामेंट 2026 च्या अतीतटीच्या लढतीमध्ये ९७४ स्टेबलफोर्ड गुणांसह अव्वल स्थान पटकावीत पुना क्लब गोल्फ कोर्स ने २०२६ चा क्वांड्रांगुलर चषक पाठविला आहे .या चषकाचे वितरण साउथ कंमाड चे मेजर जनरल संदीप सेठी यांच्या हस्ते पुना गोल्फ कोर्स चे कप्तान इकराम खान यांना आपल्या पूर्ण संघासमवेत प्रदान करण्यात आले .या स्पर्धेत पुणे क्लब गोल्फ कोर्स (PCGC) विजेते,RSI (SSGC) उपविजेता,राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) तिसऱ्या स्थानी तर CME हा संघ चौथ्या क्रमांकावर होते .पुना गोल्फ क्लब 974 ,SSTA(RSI ) 959 , NDA (894) CME (841 या प्रकारे वरील संघाने आपली कामगिरी पार पाडली .
           क्वाड्रंगुलर गोल्फ चषकाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .या स्पर्धेचे सामने RSI गोल्फ कोर्स ,एन डी ए गोल्फ कोर्स आणि सीएमई गोल्फ कोर्स आणि पुना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित करण्यात आले होते .या स्पर्धेला चारही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
             पुना गोल्फ क्लब संघाकडून इकराम खान ,इंद्रनील मुजगुले ,कार्तिक कृष्णराज,अजय कपूर ,आदित्य पुसाळकर,नीरज गुलाटी,मोहनिश अडवाणी ,सुशांत खोसला ,सुमेध गांगल ,बीजय लेंका,राज दत्ता ,अवनय खन्ना यांनी अतिशय सुरेख अशा खेळाचे प्रदर्शन दाखवले .सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
31 %
2.6kmh
75 %
Fri
32 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments