25.1 C
New Delhi
Wednesday, April 29, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिका ट्रॅक्टरने १० महिन्यांत १.५१ लाख ट्रॅक्टर विक्रीची केली नोंद

सोनालिका ट्रॅक्टरने १० महिन्यांत १.५१ लाख ट्रॅक्टर विक्रीची केली नोंद

पुणे, –  : आपल्या ३० व्या वर्धापन दिनाच्या भव्य सोहळ्याची  २०२६  मध्ये प्रभावी सुरुवात करत  भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टरने एप्रिल’ २५ ते जानेवारी’ २६ दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात जलद १,५१,६०४ ट्रॅक्टरची तारखेपर्यंतच्या वर्षात (वायटीडी) विक्री केली आहे. भविष्यानुकूल तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या हेवी-ड्युटी ट्रॅक्टरच्या आधारे सोनालिका विविध प्रदेशांमध्ये कृषी समृद्धीचे नेतृत्व करत आहे. वाढते यांत्रिकीकरण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे विकसनशील कृषी क्षेत्रात दीर्घकालीन मागणीला चालना मिळत आहे. सातत्याने वाढ करण्याची सोनालिकाची  क्षमता यातून प्रतिबिंबित होते. सोनालिकाने नुकतेच  व्यापक अखिल भारतीय ब्रँड बळकटीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून जिंकण्याची क्षमता (‘जीतने का दम’) प्रदान करण्याच्या  ब्रँडच्या उद्देशाची पुष्टी केली आहे. त्यातून ब्रँडच्या आक्रमक वाढीच्या धोरणाचे प्रतिबिंब पडले आहे.

 
स्थापनेपासून अवघ्या ३० वर्षांत सोनालिका ही छोट्या शहरातील एका कंपनीपासून भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड आणि देशातील तिसरा सर्वात मोठा ट्रॅक्टर ब्रँड बनली आहे. तसेच जागतिक पातळीवर पाचवा सर्वांत मोठा ट्रॅक्टर ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे. सोनालिकाच्या  प्रगतीचा हा प्रवास काटकसरीची अभियांत्रिकी, उत्पादनाचा अतुलनीय विस्तार आणि  अटळपणे शेतकरी-प्रथम दृष्टिकोनावर आधारित या शक्तिशाली मूलभूत तत्त्वांवर आधारलेला आहे. त्यामुळे शेतकरी सोनालिका कंपनीच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरकडे  दीर्घकालीन वाढीचे साधन या दृष्टीने पाहतात.

 
जीएसटी सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्साह आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे, त्यामुळे अधिक अपेक्षितता आली आहे. त्याचवेळेस जगातील सर्वांत मोठा एकात्मिक असा सोनालिकाचा ट्रॅक्टर कारखाना पूर्णपणे सुसज्ज आहे. शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक प्रवासात शेतीच्या भूमिकेला बळकटी आणण्यासाठी भविष्यवेधी उत्पादने पुरविण्याकरिता तो तयार आहे.

 
या नवीन कामगिरीबद्दल विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, या हंगामात रब्बी पेरणी उत्तम झाली आहे, त्यामुळे चांगले पीक येण्याची आशा निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांना आमच्या इंधन-कार्यक्षम, आरामदायी आणि शक्तिशाली ट्रॅक्टरचा लाभ घेता आला आहे. नुकतेच अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी तरतुदीमुळे प्रत्यक्ष शेती परिवर्तनासाठी दीर्घकालीन धोरणात्मक कटिबद्धतेला बळकटी मिळाली आहे, तर जीएसटी सुधारणांमुळे दीर्घकालीन उत्पादकता वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहाला आधार मिळून यांत्रिकीकरणाला गती येईल. उत्पादकता आणि गुंतवणुकीच्या आधारस्तंभांवर भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत असताना ‘जीतने का दम’च्या आधारे विश्वासार्ह, भविष्यानुकूल तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शक्ती, प्रमाण आणि स्पष्ट हेतूने ‘जीतने का दम’च्या आधारे शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
65 %
5.1kmh
100 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
39 °
Sat
41 °
Sun
41 °

Most Popular

Recent Comments